Nirmala Sitharaman Sakal
Personal Finance

Internship Scheme: एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? अर्थमंत्र्यांनी सांगितला प्लॅन

PM's Internship Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे.

राहुल शेळके

Finance Minister Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (23 जुलै) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की सरकार 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणार आहे. यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर सविस्तर बोलून काँग्रेसवर जोरदार टीका केली.

विरोधक दावा करत आहेत की पीएम इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप देणे म्हणजे प्रत्येक कंपनीत 4 हजार तरुणांना इंटर्नशिप द्यावी लागेल.

प्रत्येक कंपनीला चार हजार तरुणांना इंटर्न म्हणून नेमणे कसे शक्य होणार? तसेच ते नोकऱ्या देत नसून केवळ इंटर्नशिप देत असल्याची टीका विरोधक करत आहेत. सरकार कॉर्पोरेट अग्निवीर तयार करत आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

इंटर्नशिपचा तरुणांना मोठा फायदा : अर्थमंत्री

अर्थमंत्री म्हणाल्या की, देशातील टॉप 500 कंपन्यांचे देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक प्लांट आहेत. आम्ही इंडस्ट्रीसोबत बसून प्रत्येक योजना आखली आहे. त्यानंतरच आम्ही ही घोषणा केली आहे. टॉप 500 कंपन्यांची उलाढाल प्रचंड आहे आणि त्यांची अनेक कार्यालये आहेत.

कंपन्यांमध्ये इंटर्न करणाऱ्या तरुणांना दरमहा पाच हजार रुपये देऊ. कंपन्यांनी फक्त तरुणांना संधी द्यावी आणि त्यांना शिकवावे. तरुणांना संधी मिळाल्यावर 12 महिन्यांनंतर त्यांना टॉप 500 पैकी एका कंपनीत काम शिकल्याचे प्रमाणपत्र मिळेल. यानंतर त्यांना नोकरी मिळण्यात मोठा फायदा होईल. यामध्ये प्रत्येक महिन्याला 5000 रुपये भत्ता, तर 6000 रुपये अतिरिक्त भत्ताही दिला जाणार आहे.

'नोकऱ्या आहेत पण तरुण तयार नाहीत'

अर्थमंत्री म्हणाल्या की, उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगते की, काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी इन्फ्रा कंपनी L&T चे प्रमुख म्हणाले की, त्यांच्याकडे 45 हजार नोकऱ्या आहेत, पण त्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांसाठी योग्य तरुण सापडत नाहीत.

अशा कौशल्यांसाठी आम्ही तरुणांना तयार करत आहोत. इंटर्नशिपनंतर या तरुणांना अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणानुसार कोणती कंपनी योग्य आहे याची माहिती त्यांच्याकडे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT