Tourism Budget 2024 Sakal
Personal Finance

Tourism Budget 2024: हजारो वर्षांपूर्वीचे विद्यापीठ बनणार पर्यटन केंद्र, अर्थमंत्री सीतारमण यांच्या बजेटमध्ये अतिथि देवो भव !

Tourism Union Budget 2024 by Nirmala Sitharaman: केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सकाळी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून पर्यटन क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Puja Bonkile

India Tourism Budget 2024: आज केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी कृषी, शिक्षण, नोकरी यासारख्या विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. 

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री सीतारमण यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असून पर्यटन क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे.

पर्यटन क्षेत्राबाबत मोठी घोषणा

अर्थसंकल्पामध्ये सीतारमण यांनी बिहारमधील नालंदा नालंदाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार अशी घोषणा केली आहे. तसेच राजगीरमध्ये अनेक विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय, स्टेडियम, औद्योगिक केंद्र, महाबोधी कॉरिडॉर, पर्यटन सुविधांच्या विकासाची घोषणाही केली. नालंदा आणि राजगीरला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारही मदत करेल अशी महत्वाची घोषणा केली आहे. तसेच केंद्र सरकार बिहारमध्ये अनेक विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा पायाभूत सुविधा उभारणार आहे. यासाठी निधी देखील जाहीर केला आहे.

दरम्यान भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या, 'पर्यटन हा नेहमीच आपल्या सभ्यतेचा भाग राहिला आहे. भारताला जागतिक पर्यटन स्थळ बनवण्याचे आमचे प्रयत्न नवीन रोजगार निर्माण करतील आणि इतर क्षेत्रातही नवीन संधी निर्माण करतील. बिहारमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ राजगीर येथील गरम पाण्याचे झरे जतन करण्याचे काम केले जाईल असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय देशातील इतर ठिकाणी धार्मिक पर्यटनाला जोडून विकास कामे करण्यात आली असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

तसेच अर्थमंत्री सीतारमण यांनी ओडिसाला पर्यटनासाठी विकसित करण्याची घोषणा केली. कारण ओडिसामध्ये निसर्ग सौंदर्य खुप आहे. त्यामुळे ओडिसाला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. ओडिसामधील नैसर्गिक सौंदर्य,मंदिरे, स्मारके, वन्यजीव अभयारण्य, सुंदर सुमद्रकिनारे यामुळे ओडिशाच्या पर्यटनाला चालना मिळेल. त्याच्या विकासाठी केंद्र सरकार मदत करेल. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हातभार लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT