Byju's lenders appoint Kroll to safeguard assets of Great Learning, Singapore entity  sakal
Personal Finance

Byju's: बायजूला मोठा झटका! आता स्वतःची मालमत्ता विकता येणार नाही, काय आहे कारण?

Byju's: बायजू कंपनीला गेल्या काही काळापासून कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे

राहुल शेळके

Byju's: बायजूला गेल्या काही काळापासून कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे कारण कंपनी बऱ्याच काळापासून निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांना यश आले नाही. खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपल्या व्यवसायात बदल करत आहे. याशिवाय, कंपनीने बेंगळुरू आणि दिल्ली NCR सारख्या शहरांमध्ये आपली कार्यालये रिकामी केली आहेत आणि यावर्षी सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.

यातच आता बायजूच्या कर्जदारांनी कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी सल्लागार फर्म क्रॉलवर सोपवली आहे. कर्जदारांना याची गरज होती कारण कंपनी ती विकण्याची योजना आखत होती.

ग्रेट लर्निंग आणि बायजूच्या सिंगापूर युनिटच्या मालमत्तेची जबाबदारी क्रोल यांना देण्यात आली आहे. यामुळे ग्रेट लर्निंगच्या विक्रीच्या शक्यता थांबल्या आहेत. यापूर्वी, Byju's ने सुमारे दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या 120 कोटी डॉलरच्या मुदत कर्जाची परतफेड करण्यासाठी मालमत्ता विकण्याचा प्लॅन होता.

मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करणे हा बायजूसाठी मोठा धक्का आहे. याचे कारण असे की कंपनी प्लॅटफॉर्म कंपनी एपिक विकून 80-100 कोटी डॉलर उभारण्यासाठी चर्चा करत होती. कंपनी फक्त मुदत कर्जाची परतफेड करण्यासाठी ते विकणार होती. पण आता त्याच्या शक्यता वाढणार आहेत.

क्रोलची भूमिका काय असेल?

सल्लागार कंपनीने 11 ऑक्टोबर रोजी यासंबंधीचे निवेदन जारी केले. क्रोलची नियुक्ती बायजूच्या अल्फा च्या सुरक्षित कर्जदारांच्या वतीने करण्यात आली आहे. क्रोल म्हणतात की त्यांचे मुख्य लक्ष बायजूच्या मालमत्ता आणि व्यवसायाचे संरक्षण करणे आहे.

क्रोलने पुढे सांगितले की सल्लागार कंपनीकडे जबाबदारी सोपवल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही आणि त्यांचे सर्व अभ्यासक्रम आणि कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT