MSP Price for Crops Hikes Sakal
Personal Finance

MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; 'या' पिकांच्या 'एमएसपी'मध्ये केली वाढ

MSP price for crops hikes Latest News : मोदी सरकारच्या कॅबिनेट मिटींगमध्ये शेतकऱ्यांना मोठे दिवळी गिफ्ट देण्यात आले आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ केली आहे.

रोहित कणसे

MSP Price for Crops Hikes: मोदी सरकारच्या कॅबिनेट मिटींगमध्ये शेतकऱ्यांना मोठे दिवळी गिफ्ट देण्यात आले आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ केली आहे. यामध्ये गहू पिकाला देण्यात येणाऱ्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल १५० रुपये तर, मोहरीसाठी ३०० रुपये प्रति क्विंटलची वाढ करण्यात आली आहे.

या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ

रिपोर्टनुसार मार्केटिंग सीझन २०२५ -२६ साठी सरकारने रब्बी पिकांसाठी नवी एमएसपी निश्चित केली आहे. याअंतर्गत गव्हासाठीची एमएसपी १५० रुपये प्रति क्विंटलने वाढवून २,४२५ रुपेय करण्यात आली आहे, जी आधी २,२७५ रुपये प्रति क्विंटल होती. मोहरी पिकाची एमएसपी ३०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून ती ५,६५० रुपये प्रति क्विंटलहून वाढून ५,९५० रुपये प्रति क्विंटल झाली आहे.

यासोबतच हपभऱ्याची एमएसपी २१० रुपये प्रति क्विटल इतकी वाढवण्यात आली आहे,ज्यामुळे त्याची नवीन एमएसपी ५,६५० रुपये प्रति क्विंटल झाली आहे, जी यापूर्वी ५४४० रुपये प्रति क्विटल इतकी होती.

मसूरची एमएसपी २७५ रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आली आहे ती आता ६,४२५ रुपयांहून वाढून ६,७०० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. तर करडईच्या एमएसपीमध्ये १४० रुपये वाढवण्यात आले आहेत ज्यामुळे त्याची खिंमत ५,८०० रुपयांनी वाढून ५,९४० रुपये करण्यात आली आहे.

एमएसपी काय असते?

एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ती असते जी सरकार शेतकऱ्यांच्या धान्यासाठी निश्चित करते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास सरकार ज्या किंमतीला शेतकऱ्यांकडून त्यांचे धान्य विकत घेते त्याला एमएसपी म्हणतात. याचा उद्देश धान्यांची किंमत कमी जास्त झाली तरी शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देणे हा असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT