cait traders expected business estimate of three lakh crores in diwali festival Sakal
Personal Finance

Diwali Festival : दिवाळीत साडेतीन लाख कोटींचा व्यवसायाचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तविला

दिवाळीच्या हंगामात दिल्लीत सुमारे १० टक्के म्हणजे ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी आता बाजारपेठांमध्ये लोकांची गर्दी वाढू लागली असून, या हंगामात ३.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) वर्तविला आहे. या दिवाळीच्या हंगामात दिल्लीत सुमारे १० टक्के म्हणजे ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

दागिने, कपडे, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने अशा सर्वच क्षेत्रांत खरेदी वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनीही कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे खरेदीला चालना मिळाली असून, लोक सढळ हाताने पैसे खर्च करत असल्याचे दिसत आहे. यामुळे व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे, असे कॅटचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भारतीया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

या हंगामातील एकूण व्यावसायिक उलाढालीत २० टक्के वाटा वाहने, खेळणी यांचा, तर किराणा मालाचा वाटा १३ टक्के असण्याचा अंदाज आहे. दागिन्यांचा वाटा नऊ टक्के, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईलचा वाटा आठ टक्के असेल. कपडे १२ टक्के, सजावटीच्या वस्तूंचा वाटा तीन टक्के, सौंदर्यप्रसाधने सहा टक्के, मिठाई, सुकामेवा यांचा वाटा चार टक्के असण्याचा अंदाज कॅटने वर्तविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT