johnson and johnson baby powder Sakal
Personal Finance

Johnson And Johnson: 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला कोर्टाने ठोठावला 154 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

दोन वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाने निकाल देताना कंपनीला 154 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

राहुल शेळके

Johnson & Johnson Baby Powder case: लहान मुलांच्या त्वचाची योग्य काळजी घेतली नाही किंवा चुकीचे उत्पादन वापरले गेले तर त्याचे परिणाम किती भयानक होऊ शकतात. याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. असेच एक प्रकरण समोर आले आहे.

ज्यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर पावडरमुळे एका व्यक्तीला कॅन्सर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता न्यायालयाने कंपनीला 154 कोटींचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी लहान मुलांसाठी पावडर बनवण्यासाठी जगभर ओळखली जाते.

ताज्या प्रकरणात अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीला एका व्यक्तीला 154 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमुळे कॅन्सर झाल्याचा आरोप करत कंपनीवर दावा दाखल केला होता.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण अमेरिकेचे आहे. अँथनी हर्नांडेझ व्हॅलाडेझ नावाच्या व्यक्तीचे कंपनीवर कॅन्सर झाल्याचा आरोप केला होता. या व्यक्तीने कंपनीवर गुन्हा दाखल करून आरोप केले.

व्हॅलाडेझ यांनी लहानपणापासून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा वापर केला होता. या पावडरमुळे त्यांना कॅन्सर झाला. या पावडरचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे त्याच्या छातीजवळ मेसोथेलियोमा नावाचा कॅन्सर झाला, असे व्हॅलाडेझने न्यायालयात सांगितले.

कंपनीने दिले स्पष्टीकरण

कंपनीने न्यायालयात स्पष्टीकरण दिले असले तरी. जॉन्सन अँड जॉन्सनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनीची पावडर पूर्णपणे सुरक्षित आहे कारण ती विशेष पांढऱ्या बाटल्यांमध्ये पॅक करून विकली जाते.

अशा प्रकारच्या सुरक्षिततेनंतर आमच्या उत्पादनातून कोणालाही कॅन्सर होऊ शकत नाही. कंपनीने पुढे म्हटले आहे की त्यांना खटल्याचा कायदेशीर शुल्क आणि खटल्यातील इतर खर्च टाळण्यासाठी या प्रकरणात तोडगा काढायचा आहे.

याआधीही जॉन्सन अँड जॉन्सनच्या उत्पादनांबाबत काही प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागली होती. जरी याआधीच्या प्रकरणांमध्ये देखील कंपनीने विक्रीत घट झाल्याचे कारण देत उत्पादने बाजारातून काढून टाकली होती.

या प्रकरणातही पीडित व्यक्तीला सुमारे दोन वर्षे प्रदीर्घ लढा द्यावा लागला. दोन वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयाने निकाल देताना कंपनीला 154 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT