Visa Power Bank Fraud Case Sakal
Personal Finance

Bank Fraud Case: आणखी एक बँक घोटाळा, 1,964 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने दाखल केला गुन्हा

Visa Power Bank Fraud Case: पीएनबी बँकेचाही समावेश

राहुल शेळके

Visa Power Bank Fraud Case: केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने 1,964 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी Visa Power Ltd आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष विशंभर सरन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

अधिका-यांनी सांगितले की एजन्सीने पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) तक्रारीवरून ही कारवाई सुरू केली, 14 कर्जदारांची 1,964 कोटी रुपयांचे मुदत कर्ज मंजूर केले होते. पीएनबी ही या टाय-अपसाठी आघाडीची बँक होती आणि तिने 394 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते.

ते म्हणाले की, बँकेने आरोप केला आहे की कंपनी आणि आरोपी अधिकारी - चेअरमन सरन आणि संचालक विकास अग्रवाल आणि सुब्रतो त्रिवेदी यांनी छत्तीसगडमधील रायगड येथे 1,200 मेगावॅट क्षमतेच्या कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्रकल्पाच्या विकासासाठी कर्जासाठी बँकेशी संपर्क साधला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एफआयआरमध्ये विकास अग्रवाल आणि सुब्रतो त्रिवेदी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. एफआयआरनुसार, "असे कळले आहे की आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून आणि गुन्हेगारी कट रचून एनपीएच्या तारखेपासून बँकांचे 1,964 कोटी रुपयांचे आणि व्याजाचे नुकसान केले आहे."

हा प्रकल्प प्रत्येकी 600 मेगावॅटच्या दोन टप्प्यांत राबवला जाणार होता आणि कर्जदारांद्वारे वित्तपुरवठा केला जाणार होता. पण तो प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही.

पीएनबीच्या तक्रारीत म्हटले आहे की, “आरोपींनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविरुद्ध (पीएसबी) फसवणूक करण्याचा कट रचला आहे आणि भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार विविध गुन्हे केले आहेत. त्यांनी सांगितले की, पीएनबीने आरोपींविरुद्ध 'लूक आउट सर्क्युलर' आधीच जारी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT