Central bank gold purchases a hedge against sanctions risk says Gita Gopinath Sakal
Personal Finance

Cold War: आंतरराष्ट्रीय बाजारात नवं 'कोल्ड वॉर'; चीन झपाट्याने करतंय सोन्याची खरेदी, भारतावर काय होणार परिणाम?

Gita Gopinath Cold War: अनेक केंद्रीय बँका त्यांच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात स्वत:चा बचाव करण्यासाठी बँका हे पाऊल उचलत आहेत. असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले.

राहुल शेळके

Gita Gopinath Cold War: अनेक केंद्रीय बँका त्यांच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात स्वत:चा बचाव करण्यासाठी बँका हे पाऊल उचलत आहेत. असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले.

चीनच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा 2015 पासून वाढत आहे. चीनच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा 2015 मध्ये 2 टक्क्यांहून कमी होता तो 2023 मध्ये 4.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. हा ट्रेंड केवळ चीन आणि रशियाद्वारे चालवला जात नाही. महत्त्वाचे म्हणजे, याच कालावधीत, यूएस ब्लॉकमधील देशांच्या चलन साठ्यात सोन्याचा वाटा मोठ्या प्रमाणावर स्थिर राहिला आहे.

परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. मार्च तिमाहीत भारताच्या परकीय चलन साठ्यात 19 टनांची भर पडली आहे. भाषणादरम्यान, गोपीनाथ यांनी सध्याच्या व्यापार व्यवहारांशी तुलना शीतयुद्धाच्या काळाशी केली आहे.

चीनचा सोन्यावरील विश्वास दीर्घकाळ अबाधित राहणार असल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच मेटल्स डेलीचे सीईओ रॉस नॉर्मन म्हणाले की, चीन सोन्याच्या किमती वाढवत आहे. पहिल्या तिमाहीत चीनमध्ये सोन्याचा वापर वर्षभरापूर्वीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढला आहे.

चीनची रिअल इस्टेट संकटात आहे, त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा विचार करत आहेत. याशिवाय चीनमधील सोन्याची मुख्य खरेदीदार ही केंद्रीय बँक आहे. पीपल्स बँक ऑफ चायना (PBC) सलग 17 महिने सोने खरेदी करण्यात आघाडीवर आहे.

गेल्या वर्षी या बँकेने जगातील इतर सर्व केंद्रीय बँकांच्या तुलनेत सर्वाधिक सोने खरेदी केले होते. यामुळे बँकेचा सोन्याचा साठा गेल्या 50 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. अहवालात असे म्हटले आहे की चीन बर्याच काळापासून अमेरिकेच्या तिजोरीतील आपली भागीदारी हळूहळू कमी करत आहे.

बीजिंगमधील बीओसी इंटरनॅशनलचे जागतिक मुख्य अर्थशास्त्रज्ञ गुआन ताओ यांनी सांगितले की, चीनने देशांतर्गत सोन्याचा साठा वाढवण्यासाठी आपल्या चलनाचा वापर केला.

चीनी बँका सोने खरेदीसाठी विदेशी चलन वापरत आहेत. खरे तर रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले होते. या निर्बंधांनी चीनचे डोळे उघडले आहेत. यामुळेच ते अमेरिकन डॉलर आणि इतर चलनांवरचे अवलंबित्व कमी करत आहे.

तसेच तैवान आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार तणावामुळे रशियाला आज जे दिवस दिसत आहेत ते भविष्यात चीनला पहावे लागतील अशी भीती चीनला वाटत आहे. या भीतीने चीन आपल्या चलन साठ्यात विविधता आणत आहे. या धोरणात सोने महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT