LIC Agents Benefits Sakal
Personal Finance

LIC Agents: निर्मला सीतारमण यांची LIC एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, मिळणार...

LIC Agents Benefits: अर्थ मंत्रालयाने कोणत्या निर्णयांना दिली मंजुरी?

राहुल शेळके

LIC Agents Benefits: आज अर्थ मंत्रालयाने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कर्मचारी आणि LIC एजंटसाठी अर्थ मंत्रालयाने त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा, मुदत विमा संरक्षण आणि कौटुंबिक पेन्शनसाठी मोठी घोषणा केली आहे.

अर्थ मंत्रालयाने कोणत्या निर्णयांना दिली मंजुरी?

1. एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे आणि याद्वारे त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होईल आणि एलआयसी एजंटना फायदा होईल.

2. एलआयसी एजंटसाठी मुदतीचे विमा संरक्षण वाढविण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी टर्म इन्शुरन्स कव्हर 3000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.मुदत विम्याची रक्कम वाढवून, निधन झालेल्या एलआयसी एजंटच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना अधिक कल्याणकारी लाभ मिळू शकतील.

3. एलआयसी कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी त्यांना 30 टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळू शकेल.

13 लाखांहून अधिक एलआयसी एजंटना होणार फायदा

अर्थ मंत्रालयाने ट्विटरवर ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजनांना मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा कंपनीच्या एक लाखाहून अधिक नियमित कर्मचारी आणि 13 लाखांहून अधिक एजंटांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT