Central Govt Employees Sakal
Personal Finance

Central Govt Employees: 'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेआधी मिळणार पगार, काय आहे कारण?

Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Central Govt Employees: केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता त्यांना निवृत्ती वेतन आणि पगार वेळेआधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रातील सेवानिवृत्त आणि सेवारत कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. या दोन राज्यांतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना ओणम आणि गणेश चतुर्थी सणापूर्वी त्यांच्या खात्यात पगार आणि पेन्शन जमा होईल.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सणांचा काळ लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी तर केरळमध्ये ओणम उत्साहात साजरा केला जातो.

यामुळेच केंद्र सरकारने आपल्या सेवानिवृत्त आणि सेवारत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि वेतन वेळेपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाने यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे.

सर्व केंद्रीय पेन्शनधारकांची पेन्शन PAO द्वारे पाठवली जाईल

अधिसूचनेत असे म्हटले आहे की, 'ओणम' सणाच्या पार्श्वभूमीवर, यावेळी केरळमधील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार 25 ऑगस्ट 2023 रोजी त्यांच्या खात्यात पाठवले जातील.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतन 27 सप्टेंबर 2023 रोजी खात्यात पाठवले जातील. विशेष म्हणजे केरळच्या सर्व केंद्रीय पेन्शनधारकांची पेन्शन पीएओकडून पाठवली जाईल.

अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, सर्व केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना त्यांच्या केरळ आणि महाराष्ट्रातील स्थानिक कार्यालयांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार वेळेत करण्यासाठी वेळेपूर्वी तयारी करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, केरळ सरकारनेही ओणमपूर्वी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ओणमच्या दिवशी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 4,000 रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT