China Property Woes Deepen With Vanke Slump, Country Garden Halt  Sakal
Personal Finance

China: चीनमधील रिअल इस्टेट संकट अधिक गडद; 2 मोठ्या कंपन्या कर्जाच्या विळख्यात, नेमकं काय घडतय?

Chinese Real-Estate Industry: भारताचा शेजारील देश चीनवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले

राहुल शेळके

Chinese Real-Estate Industry: भारताचा शेजारील देश चीनवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि आता चीनमधील रिअल इस्टेट संकट अधिकच गडद होताना दिसत आहे.

देशातील सर्वात मोठी रिअल इस्टेट फर्म कंट्री गार्डन होल्डिंग्स कंपनीने वेळेवर आर्थिक निकाल जाहीर केले नाहीत. कंपनीच्या नफ्यात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाल्याची शक्यता आहे. कंट्री गार्डन होल्डिंग्स कंपनी एकेकाळी चीनमधील विक्रीनुसार सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी होती.

चायना व्हँके कंपनी, एकेकाळी चीनमधील सर्वात मोठी लिस्टेड कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या नफ्यात 46% घसरण झाली आहे. चायना व्हँके 1991 मध्ये लिस्ट झाली होती आणि त्यानंतरच्या नफ्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे.

रिअल इस्टेटमधील मंदीमुळे चिनी बँकांची बुडीत कर्जेही वाढत आहेत. कमकुवत अर्थव्यवस्था आणि ग्राहकांचा विश्वास नसल्यामुळे चीनमधील घरांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

नवीन आणि वापरलेल्या दोन्ही घरांच्या किंमती फेब्रुवारीमध्ये वार्षिक आधारावर घसरल्या. त्यामुळे या संकटात सापडलेल्या बाजारपेठेला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिनी अधिकाऱ्यांसमोरील आव्हानात भर पडली आहे.

CGS इंटरनॅशनल सिक्युरिटीज HK चे चायना प्रॉपर्टी रिसर्चचे प्रमुख रेमंड चेंग म्हणाले, चीनचे प्रॉपर्टी सेक्टर पहिल्यांदाच घसरणीच्या मार्गावर आहे. डेव्हलपर्सच्या विक्रीत सुधारणा होईपर्यंत आम्ही या क्षेत्राबाबत सावध आहोत."

चीनच्या मालमत्ता क्षेत्रासाठी हा मोठा धक्का आहे कारण कंट्री गार्डन आणि व्हँके या दोन्ही कंपन्यांमध्ये अलीकडेपर्यंत मालमत्ता क्षेत्रातील मंदीचा परिणाम झाला नव्हता. व्हँके सध्या विमा कंपन्यांशी वाटाघाटी करून कर्जावरील थकबाकी टाळण्यासाठी धडपडत आहेत. शांघाय स्टॉक एक्स्चेंजवर व्हँकेचा स्टॉक शुक्रवारी 3.8% घसरून जवळपास दशकभरातील सर्वात नीचांकी पातळीवर गेला आहे.

रिअल इस्टेट कंपन्या संकटात का आहेत?

चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहे. लोक नवीन घरे घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे किंमती घसरत आहेत, तर बेरोजगारीही वाढत आहे.

रिअल-इस्टेट बाजार थंडावला आहे कारण वाढलेले व्याजदर, कर्ज घेण्याचे नियम आणि चीनमधील मंदी यांसह अनेक कारणांमुळे 2021 पासून रिअल-इस्टेट क्षेत्र थंड पडले आहे. रिअल इस्टेट कंपन्यांना घरे विकणे कठीण झाले आहे.

चीनमधील अनेक प्रॉपर्टी कंपन्यांनी कंपनीचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतले आहे. मात्र सध्या बाजारात मंदी असल्याने त्यांना उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे रिअल इस्टेट कंपन्या कर्जाच्या विळख्यात सापडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT