Cholamandalam Investment and Finance Company stock analysis  Sakal
Personal Finance

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी (शुक्रवारचा बंद भाव : रु. १२८०)

तांत्रिक आलेखानुसार, जुलै २०२३ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे.

भूषण गोडबोले

मुरुगप्पा समूहाची ‘चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स’ ही कंपनी भारतातील प्रमुख वैविध्यपूर्ण बिगरबँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक आहे, जी वाहन, गृहकर्ज आणि मालमत्तेवर कर्ज प्रदान करण्यात गुंतलेली आहे. वाहन वित्तपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यक्षमता आणि अनुभव हे या कंपनीकडील स्पर्धात्मक वैशिष्टय आहे.

सध्या कंपनीच्या भारतात १३७० पेक्षा जास्त शाखा कार्यरत आहेत. ग्रामीण भागात कंपनीच्या साधारण ९० टक्क्यांपेक्षा जास्त शाखा आहेत. ज्या ग्राहकांकडे बँकेकडून कर्ज घेण्याचे मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत मात्र, ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या गुणवत्तेनुसार कर्ज परतफेड करण्याची क्षमता आहे, अशा ग्राहकांकडे लक्ष केंद्रित करून या कंपनी प्रगती करत आहे.

आगामी काळात पायाभूत सुविधांच्या खर्चासारखे मजबूत संरचनात्मक घटक हे थेट व्यावसायिक वाहन आणि बांधकाम उपकरणे विभागांची मागणीत वाढ करू शकतात. वाहनासाठी लागू असलेले कठोर उत्सर्जन नियम,

सुरक्षा वैशिष्ट्ये जसे की अनिवार्य एअरबॅग्ज, नवे स्क्रॅपेज धोरण, वाहन बदलण्याची मागणी, देशभरात लास्ट माईल डिलिव्हरीसाठी लहान व्यावसायिक वाहन मागणी आदी घटकांमुळेदेखील वाहनविक्री क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या मागणीचा फायदा या कंपनीला मिळणे अपेक्षित आहे.

तांत्रिक आलेखानुसार, जुलै २०२३ पासून या कंपनीच्या शेअरने मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शविला आहे. आगामी काळात १३५३ रुपये या पातळीच्यावर बंद भाव दिल्यास आलेखानुसार तेजीचे संकेत मिळू शकतील. जाहीर झालेल्या निकालानुसार गेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल ५४२८ कोटी रुपये झाला आहे;

तसेच कंपनीचा निव्वळ नफा १०६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीने, वार्षिक आधारावर सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत, कर्जवितरणात गेल्या १० वर्षांमध्ये वेगाने प्रगती केली आहे. आगामी काळातील व्यवसायवृद्धीची शक्यता आणि क्षमता; तसेच जोखीम लक्षात घेऊन या शेअरमध्ये मर्यादित प्रमाणात दीर्घावधीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT