Coal Scam Under BJP Government Rahul Gandhi serious allegation on Adani Group and PM modi Sakal
Personal Finance

Rahul Gandhi: मोदीजी सांगा, प्रिय मित्र अदानीसाठी किती टेम्पो लागले? राहुल गांधींचा कोळसा घोटाळ्यावरुन हल्लाबोल

Rahul Gandhi on Adani Coal Scam: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राहुल शेळके

Rahul Gandhi on Adani Coal Scam: लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. फायनान्शिअल टाइम्स वृत्तपत्राचे कटिंग शेअर करत त्यांनी लिहिले की, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या घोटाळ्यातून मोदीजींचे प्रिय मित्र अदानी यांनी कमी दर्जाचा कोळसा तिप्पट किमतीत विकून हजारो कोटी रुपयांची लूट केली आहे.

राहुल गांधींनी इंग्रजी वृत्तपत्र फायनान्शिअल टाइम्सचे कटिंग शेअर केले आहे. यामध्ये कोळशाशी संबंधित अहवाल देण्यात आला आहे. याबाबत राहुल गांधी यांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, भाजप सरकारमध्ये मोठा कोळसा घोटाळा समोर आला आहे. ज्याची किंमत सर्वसामान्य जनतेने महागडी वीज बिले भरून स्वतःच्या खिशातून चुकवली आहे.

त्यासोबत त्यांनी पुढे लिहिले की, या उघड भ्रष्टाचारावर ईडी, सीबीआय आणि आयटीला गप्प ठेवण्यासाठी किती टेम्पोची गरज होती हे पंतप्रधान सांगतील का? 4 जून नंतर, इंडिया आघाडीचे सरकार या मेगा घोटाळ्याची चौकशी करेल आणि जनतेकडून लुटलेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब देईल.

अहवालात आरोप करण्यात आला आहे की अदानी समूहाने कमी दर्जाचा कोळसा (प्रति किलो 3,500 कॅलरीज असलेला) इंडोनेशियाकडून खरेदी केला आणि तो 6,000-कॅलरी कोळसा म्हणून विकून मोठा नफा मिळवला.

जानेवारी 2014 च्या इनव्हॉइसेसचा हवाला देऊन, फायनान्शिअल टाइम्सने दावा केला आहे की 2014 मध्ये एकूण 1.5 दशलक्ष टन कोळशाच्या 22 शिपमेंट्सचा पुरवठा करण्यात आला. ज्याद्वारे अदानी समूहाने त्याचे पैसे दुप्पट केले.

अदानी समुहाने 32,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत गांधी यांनी असेच आरोप केले होते आणि ते म्हणाले होते की, "गौतम अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करतात आणि तो भारतात पोहोचतो तेव्हा त्याची किंमत दुप्पट होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT