Coca-Cola India enters ready-to-drink tea beverages segment  Sakal
Personal Finance

कोल्ड ड्रिंकनंतर आता कोका-कोलाची चहा मार्केटमध्ये एन्ट्री; 'ऑनेस्ट टी'च्या नावाने विकणार चहा

Coca-Cola Ready to Drink Tea: कोणत्या फ्लेवर्समध्ये मिळणार चहा?

राहुल शेळके

Coca-Cola Ready to Drink Tea: कोका-कोला इंडियाने त्यांच्या ड्रिंक्स पोर्टफोलिओमध्ये आणखी एका पेयाचा समावेश केला आहे. यामध्ये कंपनीने चहाचा समावेश केला आहे. कंपनीने ऑनेस्ट टी या नावाने एक उत्पादन लाँच केले आहे.

हा ब्रँड कोका-कोला कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑनेस्टच्‍या मालकीचा आहे. हा एक प्रकारचा सेंद्रिय चहा असेल. यासाठी कंपनीने कोलकाता येथील एका कंपनीशी करार करून हे हर्बल चहाचे उत्पादन बाजारात आणले आहे.

या सेंद्रिय चहा उत्पादनासाठी, कोका-कोला कंपनीने कोलकाता स्थित लक्झमी टी को प्रायव्हेट लिमिटेडच्या मकाईबारी टी इस्टेटशी करार केला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

या फ्लेवर्समध्ये मिळणार चहा

या दोन कंपन्यांनी बंगाल ग्लोबल बिझनेस समिट (BGBS) च्या सातव्या कार्यक्रमात सामंजस्य करार केला होता. या सामंजस्य कराराद्वारे, कोका-कोला इंडिया कंपनीने तयार चहाचे उत्पादन लाँच केले आहे.

हे उत्पादन लाँच करण्यामागचा उद्देश म्हणजे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. ऑनेस्ट टी हा ग्रीन टी, लिंबू, तुळस आणि आंबा या फ्लेवर्समध्ये असणार आहे.

भारतात कोका कोलाची विक्री 1949 मध्ये सुरू झाली. त्यावेळी भारतातील ही एकमेव कंपनी होती. कंपनीने 1977 मध्ये आपला व्यवसाय बंद केला, कारण परकीय चलन कायद्यानुसार तिला भारतीय उपकंपनीला अधिक हिस्सा द्यावा लागणार होता.

यानंतर कॅम्पा कोला सुरू करण्यात आला. स्पर्धेअभावी तो बाजारात लोकप्रिय झाला. 90 च्या दशकात, कौटुंबिक विवादांमुळे हा ब्रँड देखील बाजारातून गायब झाला, त्यानंतर पेप्सिकोने भारतात प्रवेश केला, 1991 नंतर कोका कोलाने पुन्हा भारतात आपली उत्पादने विकण्यास सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT