Coca-Cola India forays into the alcohol beverages segment with Lemon-Dou  Sakal
Personal Finance

Coca-Cola India: कोका-कोलाची अल्कोहोल क्षेत्रात एन्ट्री; महाराष्ट्र अन् गोव्यात करणार मोठी चाचणी

Coca-Cola India: कंपनीचा हा प्लॅन नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी करत आहे.

राहुल शेळके

Coca-Cola India: कोका-कोला इंडिया आता अल्कोहोल क्षेत्रात एन्ट्री करत आहे. कंपनीचा हा प्लॅन नवीन बाजारपेठ शोधण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी आहे. कोका-कोला इंडिया कंपनी भारतातील काही राज्यांमध्ये लेमन-डूची चाचणी करत आहे.

लेमन-डूमध्ये काही प्रमाणात अल्कोहोल आहे. ही पेये जपानच्या प्रसिद्ध 'चू-हाय' पेयावर आधारित आहेत, ज्यात विविध फळांच्या चवींचा समावेश आहे. कंपनीने गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये लेमन-डूची प्रायोगिक चाचणी सुरू केली आहे.

2018 मध्ये पहिल्यांदा जपानमध्ये लॉन्च केले

Lemon-Dou हे chuhai म्हणून ओळखले जाते. हे जपानमधील स्थानिक अल्कोहोल आणि फळांपासून तयार केले जाते. जपानमध्ये बिअरला पर्याय म्हणून चू-ही (chuhai) पेये विकली जातात. दारूचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये हे खूप लोकप्रिय आहेत.

संत्री, द्राक्ष आणि लिंबू हे फ्लेवर्स जपानमध्ये लोकप्रिय आहेत. Lemon-Dou हे Coca-Cola चे पहिले रेडी-टू-ड्रिंक अल्कोहोल पेय होते, जे त्यांनी 2018 मध्ये जपानमध्ये लॉन्च केले.

कोका-कोला भारतात कोक, स्प्राईट, थम्स अप, फॅन्टा आणि लिम्का फिजी ड्रिंक्स, माझा आणि मिनिट मेड ज्यूस, किन्ले वॉटर, चहा आणि कॉफी ब्रँड जॉर्जिया आणि कोस्टा कॉफी ही शीतपेय उत्पादने विकते. कोका-कोला ही भारतातील सर्वात मोठी शीतपेय कंपनी आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात अल्कोहोल वितरण आणि उत्पादन व्यवसाय असल्याने, कोका-कोला हळूहळू बाजारपेठेत प्रवेश करेल, असे कंपनीच्या योजनांची माहिती असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले. जपान आणि आता भारताव्यतिरिक्त, चीन आणि फिलीपिन्स सारख्या निवडक देशांमध्ये लेमन-डू पेय उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात कोका-कोलाची गुंतवणूक

कोका-कोला कंपनी कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात नवीन प्लांट सुरू करणार आहे. हा प्रकल्प 2025 पर्यंत सुरू होऊ शकतो.

या प्रकल्पातील गुंतवणुकीच्या रकमेबाबत सरकार आणि कंपनीकडून वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. या प्रकल्पात कंपनी 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे महाराष्ट्र सरकार सांगत आहे, तर 1,387कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईत वाहतूक बदल; 'या' भागात प्रवेश बंदी, वाचा सविस्तर...

Viral Video: कुलूप उघडण्याची अनोखी पद्धत! चोराचा लाईव्ह डेमो पाहून पोलीसही अवाक्... पाहा व्हिडिओ

Pawandeep Rajan : अपघाताच्या 3 महिन्यानंतर 'इंडियन आयडल 12' चा विजेता पवनदीप कसा आहे? म्हणाला माझा जीव....

निशांची मधील पहिले गाणे 'डिअर कंट्री' प्रदर्शित! तबल्याच्या ठेक्यांसह हार्मोनियमच्या सूरांनी केले मनात घर

Malegaon Crime : मालेगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३० दुचाकी चोरणाऱ्या ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT