Cognizant warns employees of layoff for defying return-to-office diktat  Sakal
Personal Finance

Cognizant: कॉग्निझंट कंपनीचा धक्कादायक निर्णय! कर्मचाऱ्यांनी ऑफिसला न आल्यास जाणार नोकरी; काय आहे प्रकरण?

Cognizant WFO Policy: कॉग्निझंट कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितले आहे. कार्यालयात परतण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कॉग्निझंट कारवाई करू शकते. अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न आल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते

राहुल शेळके

Cognizant WFO Policy: कॉग्निझंट कंपनीने कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितले आहे. कार्यालयात परतण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कॉग्निझंट कारवाई करू शकते. अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न आल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते, असा इशारा कंपनीने दिला आहे. यासह, कॉग्निझंट आपल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परत न आल्यास त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेणारी पहिली मोठी आयटी कंपनी बनली आहे.

मिंटच्या अहवालानुसार, कॉग्निझंटच्या पत्रानुसार, कंपनीने त्यांच्या सूचनांचे पालन केले नाही तर, कंपनी शिस्तभंगाची कारवाई सुरू करेल. हे पत्र एका कर्मचाऱ्याला पाठवण्यात आले आहे. ज्याला प्रोजेक्ट मॅनेजर, एचआर टीम आणि टीम मॅनेजर यांच्याकडून ऑफिसमधून अनेक सूचना मिळाल्या होत्या.

या वर्षाच्या सुरुवातीला, न्यू जर्सीस्थित टीनेक कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन वेळा कार्यालयात येण्यास सांगितले होते. फेब्रुवारीमध्ये, कॉग्निझंटने आपल्या कर्मचाऱ्यांना, ईमेल केले होते की, कार्यालयातील त्यांच्या कामाच्या वेळेचा तपशील घेतला जाईल.

भारतात कॉग्निझंटचे किती कर्मचारी आहेत?

कॉग्निझंटच्या 3,47,700 कर्मचाऱ्यांपैकी 73% किंवा 2,54,000 कर्मचारी भारतात आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत, कॉग्निझंटने कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले नव्हते. पण नंतर कंपनीने आपले धोरण बदलले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात जाऊन काम करावे लागणार आहे.

कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस काय म्हणाले?

कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांनी फेब्रुवारीमध्ये एका मेमोमध्ये म्हटले होते की सर्व भारतीय कर्मचाऱ्यांनी दर आठवड्यात सरासरी तीन दिवस कार्यालयात किंवा त्यांच्या टीम लीडरने सांगितल्यानुसार कार्यालयात येणे अपेक्षित आहे.

कॉग्निझंटच्या वार्षिक अहवालानुसार सुमारे 2,54,000 कर्मचारी भारतात आहेत, जो कंपनीचा सर्वात मोठा कर्मचारी वर्ग आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या भारतीय आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 2023 पासून कार्यालयात येण्यास अनिवार्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT