Cohere Layoffs Sakal
Personal Finance

AI Job Cuts: AI कंपनीत काम करणाऱ्यांवरच नोकर कपातीचं संकट; इतक्या कर्मचाऱ्यांना बसणार फटका

Cohere Announces Layoffs: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यामुळे नोकऱ्या जाण्याचा धोका वाढत आहे असेही बोलले जात आहे. मात्र आता एका AI कंपनीची चर्चा होत आहे कारण या कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

राहुल शेळके

Cohere Layoffs: आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यामुळे नोकऱ्या जाण्याचा धोका वाढत आहे असेही बोलले जात आहे. मात्र आता एका AI कंपनीची चर्चा होत आहे कारण या कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

कोहेरे या जनरेटिव्ह एआय स्टार्टअप कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. स्टार्टअप कंपनीला मोठा निधी मिळाला असल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

फॉर्च्युनच्या अहवालानुसार, स्टार्टअप कोहेरेला या आठवड्यात मंगळवारी 500 दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला आणि त्यानंतर कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला. काही तासांपूर्वी कंपनी नवीन भांडवल आणि मूल्यांकन वाढवण्यासाठी चर्चेत होती.

5 टक्के कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

अहवालानुसार, कंपनी आपल्या सुमारे 20 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. कंपनीकडे सध्या एकूण 400 कर्मचारी आहेत. म्हणजेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 5 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे. कंपनीचे सीईओ एडन गोमेझ यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून त्यांना संभाव्य नोकर कपातीची माहिती दिली आहे.

सीईओने कर्मचारी कपातीचे सांगितले कारण

कंपनीचे सीईओ एडन गोमेझ म्हणाल की, उद्योगात पुढे राहण्यासाठी आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी, योग्य लोक योग्य ठिकाणी आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. यामुळे कंपनी नोकर कपात करत आहे.

त्यांची एआय स्टार्टअप कंपनी भविष्यातही जास्त लोकांना कामावर ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कंपनीचे लक्ष रिक्त पदे भरणे आणि कंपनीच्या वाढीसाठी निवडलेल्या धोरणात्मक क्षेत्रात नवीन लोकांना आणणे यावर भर देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT