LPG Cylinder Price
LPG Cylinder Price Sakal
Personal Finance

LPG Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी, LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किंमतीत मोठी घट

राहुल शेळके

LPG Price Reduced: आज, 1 एप्रिल 2023 पासून, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, तुम्हाला LPG सिलिंडरच्या किंमती कमी झाल्याची आनंदाची बातमी ऐकायला मिळाली आहे. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किंमतींचा आढावा घेतात आणि त्यात बदल करतात.

व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती कमी केल्या :

पेट्रोलियम कंपन्यांनी आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली असून ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे.

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत आज 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या सर्व शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असून ते स्वस्त झाले आहेत.

तुमच्या शहरातील एलपीजीची नवीन किंमत जाणून घ्या :

  • दिल्ली - 2028.00

  • कोलकाता - 2132.00

  • मुंबई - 1980.00

  • चेन्नई - 2192.50

तुमच्या शहरातील एलपीजीची जुनी किंमत जाणून घ्या :

  • दिल्ली - 2119.50

  • कोलकाता - 2221.50

  • मुंबई - 2071.50

  • चेन्नई - 2268.00

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही :

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्याच्या किंमतीत पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत.

दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये प्रति सिलेंडर आहे. 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर गेल्या महिन्यात 50 रुपयांनी तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला होता.

जाणून घ्या LPG च्या किंमती किती कमी झाल्या आहेत :

आजपासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 91.5 रुपये स्वस्त होऊन आता तो 2028 रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडर 2132 रुपयांना मिळणार असून, 89.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

दुसरीकडे, आर्थिक राजधानी मुंबईत, एलपीजी सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त होईल आणि 1980 रुपयांना उपलब्ध होईल, म्हणजेच त्याची किंमत 2000 रुपयांच्या खाली आली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 75.5 रुपयांनी स्वस्त होऊन 2192.50 रुपयांना मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT