Tata Capital Merger Sakal
Personal Finance

Tata Merger Plan: टाटा करणार अंबानींशी थेट स्पर्धा, 3 कंपन्यांच्या विलीनीकरणाचा मार्ग झाला मोकळा

Tata Capital Merger: सीसीआयची मंजुरी मिळाल्यानंतर 3 कंपन्यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

राहुल शेळके

Tata Capital Merger: भारतीय कॉर्पोरेट क्षेत्र अलिकडच्या काळात थेट स्पर्धा करत आहे. रिटेलपासून दूरसंचारपर्यंतच्या क्षेत्रात बड्या कॉर्पोरेट्स उघडपणे समोरासमोर आल्या आहेत. आता टाटा आणि अंबानी यांच्यात अशी टक्कर होण्याची शक्यता तयार झाली आहे. प्रस्तावित विलीनीकरणाच्या कराराला CCI ची मंजुरी मिळाल्याने हे आता स्पष्ट झाले आहे.

'या' कंपन्या विलीन होणार आहेत

ट्रेड रेग्युलेटर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने टाटा समूहाच्या कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाला एक दिवसापूर्वी मंजुरी दिली.

या प्रस्तावित करारांतर्गत, टाटा समूहाच्या दोन कंपन्या टाटा क्लीनटेक कॅपिटल आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीन होणार आहेत.

सध्या, टाटा क्लीनटेक कॅपिटल आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या टाटा कॅपिटल लिमिटेडच्या उपकंपनी म्हणून काम करत आहेत.

या दोन्ही कंपन्या रिझर्व्ह बँकेकडे NBFC म्हणून नोंदणीकृत आहेत. टाटा कॅपिटल सध्या आरबीआयमध्ये मुख्य गुंतवणूक कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे. ही कंपनी कर्ज देण्याबरोबरच वित्तीय सेवा क्षेत्रात विविध प्रकारच्या सेवा पुरवत आहे.

टाटा क्लीनटेक कॅपिटल आणि टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे टाटा कॅपिटल लिमिटेडमध्ये विलीनीकरण केल्याने एक वित्तीय सेवा कंपनी तयार होईल जी आकाराने वाढेल.

अशा परिस्थितीत आकारासोबतच कंपनीची कार्यक्षमताही वाढेल. मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांना CCI ची मंजुरी आवश्यक आहे. याप्रकरणी सीसीआयची मंजुरी मिळाल्यानंतर विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

वित्तीय सेवा क्षेत्रात अंबानी

दुसरीकडे, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनेही वित्तीय सेवा क्षेत्रासाठी मोठी तयारी केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच तिचे वित्तीय सेवा युनिट डिमर्ज केले आहे आणि Jio Financial Services Limited नावाची नवीन कंपनी स्थापन केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज येत्या काही दिवसांत जिओ फायनान्शिअलला बाजारात सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT