cover loan financial planning financial freedom investment Esakal
Personal Finance

Financial Planning : तू कोणाचा गुलाम!

आपल्या आर्थिक नियोजनाकरिता, आर्थिक स्वातंत्र्यासाठी या गुलामगिरीचा चांगला उपयोग करून घेणे शक्य

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद घारे

आपल्या दैनंदिन जीवनात आपण कुठल्यातरी चांगल्या किंवा वाईट सवयींचे गुलाम असतो. उदाहरणार्थ, रोज गोड पदार्थांचा स्वाद घेतल्याशिवाय काहींना चैन पडत नाही. दररोज सिगारेट ओढल्याशिवाय काही लोक जगू शकत नाहीत. त्यामुळे आपण कोणाचे गुलाम आहोत, हा प्रश्‍न स्वतःला विचारला, तर आपल्याला नक्की उत्तर मिळेल.

गुलामगिरीचा सदुपयोग

या गुलामगिरीचा चांगला उपयोग कसा करायचा याचा विचार करू. आपल्या आर्थिक नियोजनाकरिता, आर्थिक स्वातंत्र्यासाठी या गुलामगिरीचा चांगला उपयोग करून घेणे शक्य आहे. सर्वप्रथम आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे विचारात घ्या.

आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा किती आहे, आपण जी गुंतवणूक आजपर्यंत केली आहे, ती कोठे केली आहे आणि ती कोणत्या कारणांसाठी केली आहे, याची व्यवस्थित नोंद करून ठेवा. आपण सगळेच सतत काहीतरी खर्च करत असतो.

त्यामुळे आपल्या उत्पन्न व खर्च यांचा मेळ रहात नाही. यासाठी दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक खर्च यांची व्यवस्थित नोंद करून ठेवा. आपले काही खर्च हे कायमस्वरूपी असतात, तर काही सतत बदलत राहणारे असतात, ते कोणते आहेत, ते तपासा.

जेणेकरून, खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि अनावश्यक खर्चाला लगाम घालणे सोयीचे होईल. मुलांचे शिक्षण, विवाह, मोटार खरेदी, नवी घरखरेदी, देशपरदेश प्रवास आणि निवृत्ती नियोजन याची तरतूद करून ठेवा. यासाठी कोठे गुंतवणूक करायची आणि कोणत्या वर्षीही रक्कम लागेल याचाही विचार करून ठेवा.

या छोट्या छोट्या गोष्टीची नोंद ठेवायची सवय लागली, तर आपल्याला आर्थिक शिस्त लागायला मदत होईल. एकदा का आर्थिक शिस्तीचे आपण गुलाम झालो, की आर्थिक स्वातंत्र्य व आर्थिक नियोजन सहज जमेल. या नियोजनातून आपली आर्थिक भरभराट नक्कीच होईल. बघा प्रयोग करुन.

चांगल्या सवयीचे जरूर गुलाम व्हा आणि योग्य आर्थिक नियोजनातून आपला आर्थिक उत्कर्ष साधा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘तू कोणाचा गुलाम?’ तुम्हाला तुमचे उत्तर मिळालेले असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी नाचत-गात होती प्रसिद्ध अभिनेत्री; पण नंतर घडलं भयंकर, संचिता उगलेनं टोकाचा निर्णय का घेतला?

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

Latest Marathi News Live Update : नागपूरातील संविधान चौकात उद्या कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन

भर गर्दीत रश्मिकाने घेतली विजयची खास काळजी; viral video पाहून नेटकरी म्हणाले, ‘अशी बायको सगळ्यांनाच मिळो!’

SCROLL FOR NEXT