Petrol-Diesel Price Today Sakal
Personal Finance

Petrol-Diesel Price: एकाच दिवसात कच्च्या तेलाचे भाव 52 रुपयांनी वाढले; पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का?

Petrol-Diesel Price 13th July: अलीकडच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत 52 रुपयांनी वाढून 6,945 रुपये प्रति बॅरल झाली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा दर सध्या 83-86 डॉलर प्रति बॅरल दरम्यान आहे.

राहुल शेळके

Petrol-Diesel Price Today: अलीकडच्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाची किंमत 52 रुपयांनी वाढून 6,945 रुपये प्रति बॅरल झाली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा दर सध्या 83-86 डॉलर प्रति बॅरल दरम्यान आहे.

13 जुलै 2024 च्या पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती तेल कंपन्यांनी जाहीर केल्या आहेत. महानगरे आणि देशातील काही निवडक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत काय आहे ते जाणून घेऊया.

वायदे बाजारात कच्च्या तेलाची किंमत किती आहे?

कच्च्या तेलाच्या किमती शुक्रवारी वायदा बाजारात 52 रुपयांनी वाढून 6,945 रुपये प्रति बॅरलवर पोहोचल्या. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवल्याने आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

परंतु भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीत. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे पुरवठा साखळी खंडित होण्याची भीती आहे.

गेल्या मार्चमध्ये किमती कमी करण्यात आल्या होत्या

15 मार्च रोजी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली होती. त्याअंतर्गत दोन्हीच्या किमती प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही कपात केली होती. आता निवडणुका संपल्या असून पेट्रोल आणि डिझेलचे दर किती दिवस कमी राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. मात्र, 22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT