Rupees 2000 rupees sakal
Personal Finance

Currency Notes: बंद झाल्यावरही लोक अजून वापरतायत २,००० रुपयांच्या नोटा; RBI गव्हर्नरांनी आकडाच सांगितला

२,००० रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख आधी ३० सप्टेंबर होती, जी नंतर ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

वैष्णवी कारंजकर

दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची किंवा बदलण्याची तारीख निघून गेली आहे, पण तरीही २,००० रुपयांच्या सर्व नोटा बँकांमध्ये परत आलेल्या नाहीत. ही नोट आजही बाजारात उपलब्ध आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. २,००० रुपयांच्या नोटांच्या रूपात अजूनही १० हजार कोटी रुपये लोकांकडे असल्याचं रिझर्व्ह बँकेचं मत आहे.

२,००० रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची अंतिम तारीख आधी ३० सप्टेंबर होती, जी नंतर ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. ३० सप्टेंबरपर्यंत एकूण नोटांपैकी ८७ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या होत्या.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितलं की, लोकांकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात १० हजार कोटी रुपये आहेत. ठेवी किंवा देवाणघेवाण करण्याच्या शेवटच्या तारखेपासून ७ ऑक्टोबरपर्यंत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात केवळ २ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. सरकारने यावर्षी १९ मे रोजी २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा त्या बदलून घेण्यास सांगण्यात आलं होतं.

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात सध्या असलेल्या सर्व २,००० रुपयांच्या नोटा त्यांना परत मिळतील. ऑक्टोबरच्या सुरुवातीला गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, काढण्यात आलेल्या २,००० रुपयांच्या ८७ टक्के नोटा ठेवी म्हणून बँकांमध्ये परत आल्या आहेत.

तुमच्याकडे अजूनही २,००० रुपयांच्या नोटा असल्यास, तुम्ही त्या देशभरात पसरलेल्या रिझर्व बँकेच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करू शकता किंवा तुम्ही टपाल खात्यामार्फत नोटा आरबीआय कार्यालयात पाठवू शकता. तुम्ही केवळ नोटाच जमा करू शकत नाही तर इतर मूल्यांच्या नोटांसह त्या बदलू शकता. बँकेच्या पुढील आदेशापर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. नोटा जमा केल्यावर तेवढीच रक्कम बँक खात्यात जमा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT