Deepfake AI Scam How AI is being used to trick Stock Market investors and how you can stay safe  Sakal
Personal Finance

Deepfake AI Scam: शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एआयचा कसा वापर केला जातो?

Deepfake Stock Market Scams: डीपफेक तंत्रज्ञान जगभर वेगाने पसरत आहे.

राहुल शेळके

Deepfake Stock Market Scams: आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती वेगाने प्रगती करत आहे हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होत आहे. डीपफेक तंत्रज्ञानही जगभर वेगाने पसरत आहे. अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील याची शिकार झाली.

डीपफेक हा शब्द डीप लर्निंग आणि फेक अशा शब्दांनी मिळून बनला आहे. हे एक बनावट तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने दुसऱ्याच्या फोटो किंवा व्हिडिओचा चेहरा सेलिब्रिटी व्हिडिओच्या चेहऱ्यासोबत बदलला जातो. तो अगदी खऱ्या फोटो आणि व्हिडिओसारखा दिसतो. हे तंत्रज्ञान जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स (GANs) वापरते ज्याद्वारे बनावट व्हिडिओ आणि फोटो तयार केले जातात.

कृत्रिमरित्या तयार केलेले फोटो, आवाज आणि व्हिडिओमुळे अनेक आर्थिक फसवणुकीच्या घटत आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वैयक्तिक, आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान होत आहे. शेअर बाजारही याला अपवाद नाही आणि डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसलेले अनेक लोक याला बळी पडत आहेत.

उदाहरणार्थ, 22 नोव्हेंबर रोजी, झिरोधा हे एक सुप्रसिद्ध स्टॉक मार्केट प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर 1.80 लाख रुपयांचा घोटाळा समोर आला. कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांनी चेतावणी दिली की डीपफेकच्या आणि एआय अॅप्सच्या वाढीमुळे फसवणुकीच्या घटना वाढत आहेत.

प्रत्येकजण असे घोटाळे टाळू शकत नाही. 2019 मध्ये, एका ब्रिटिश ऊर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्याने मूळ संस्थेच्या सीईओची तोतयागिरी करुन डीपफेक आवाजाद्वारे $250,000 (रु. 20.6 कोटी) फसवणूक केली होती. 2020 मध्ये अशाच एका घटनेत, हाँगकाँगमधील एका बँक व्यवस्थापकाला डीपफेक कॉलमुळे $35 मिलियन (रु. 288.7 कोटी) गमवावे लागले.

डीपफेक फसवणुकीची अचानक वाढ का झाली?

या घटना ChatGPT च्या उदयापूर्वी आणि जनरेटिव्ह AI येण्यापूर्वीही घडत होत्या. आज प्रगत AI तंत्रज्ञान लोकांसाठी सहज उपलब्ध आहेत. डीपफेक तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त कौशल्याची आवश्यकता लागत नाही.

क्लोन अॅप्सचा वाढता वापर

लेजर आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि बँक खात्यांच्या इतर अहवालांचे व्हिडिओ तयार करण्यासाठी घोटाळेबाज आता बनावट क्लोन अॅप्स वापरण्याकडे वळले आहेत. इंडिया टुडेज ओपन सोर्स इंटेलिजन्स (OSINT) टीमने बनावट कागदपत्रे, स्क्रीनशॉट आणि Zerodha, Grow आणि Upstox सारख्या लोकप्रिय अॅप्सचे क्लोन इंटरफेस करणारे असंख्य टेलिग्राम चॅनेल शोधले आहेत.

असेच एक अॅप Zerodha Kite Replicate हे मासिक 4,000 रुपये आणि वार्षिक 20,000 रुपये आकारते. हे अॅप वापरकर्त्यांना मार्केटवॉच, पोझिशन्स, होल्डिंग्ज, फंड आणि प्रोफाइलसह जवळजवळ प्रत्येक गोष्ट बनवण्याची परवानगी देते. Zerodha Kite आणि Groww साठी क्लोन इंटरफेस सेवा देणारे आणखी एक टेलिग्राम चॅनल दरमहा रु 3,599 आकारते.

टेक कंपन्या यावर उपाय शोधत आहेत

डीपफेकला आळा घालण्यासाठी टेक कंपन्या सतत काम करत आहेत. संशोधक आणि मोठ्या टेक कंपन्या या तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी काम करत आहेत.

डीपफेक कसा ओळखायचा?

अनेकवेळा असे घडते की एखाद्याचा बनावट व्हिडिओ किंवा फोटो बनविला जातो, परंतु तो ओळखणे कठीण असते. तुम्हीही याला बळी पडला असाल किंवा घाबरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा.

  • अशा व्हिडिओंमध्ये हात आणि पायांच्या हालचालींवर लक्ष ठेवा

  • सोशल मीडियावर वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे टाळा

  • प्रोफाइल खाजगी ठेवा

  • सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT