Demat account additions reach a record 3.7 crore in FY24  Sakal
Personal Finance

Demat Account: शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला; डिमॅट खात्यांच्या संख्येने केला नवा विक्रम

Share Market Investors: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारातील अलीकडच्या तेजीने किरकोळ गुंतवणूकदारांना खूप आकर्षित केले आहे आणि म्हणूनच ते शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत.

राहुल शेळके

Share Market Investors: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारातील अलीकडच्या तेजीने किरकोळ गुंतवणूकदारांना खूप आकर्षित केले आहे आणि म्हणूनच ते शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. आकडेवारीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात बाजारात सुमारे 3.7 कोटी नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली.

याचा अर्थ एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत बाजारात दर महिन्याला सरासरी 30 लाखांहून अधिक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. 2023-24 या आर्थिक वर्षात प्रथमच डिमॅट खातेधारकांची एकूण संख्या 15 कोटींच्या पुढे गेली आहे.

आर्थिक वर्ष 2024 मध्ये डिमॅट खात्यांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अहवालानुसार, शेअर बाजारातील तेजीमुळे 2024 या आर्थिक वर्षात सुमारे 3.7 कोटी डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत.

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (CDSL) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (NSDL) सह उघडलेल्या डिमॅट खात्यांची संख्या वार्षिक आधारावर 11.9 टक्क्यांनी वाढली आहे.

Demat account additions reach a record 3.7 crore in FY24

भारतीय शेअर्सनी गेल्या काही वर्षात जागतिक आणि उदयोन्मुख बाजारपेठांना मागे टाकले आहे आणि त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा रसही वाढला आहे. अलिकडच्या वर्षांत भारतातील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

विशेषत: कोरोना नंतर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात भारतात एकूण 4 कोटी डिमॅट खाती उघडण्यात आली. सध्या हा आकडा 16 कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. म्हणजेच गेल्या 4 वर्षांत डिमॅट खात्यांची संख्या चौपट झाली आहे.

गेल्या काही वर्षांत शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. या कारणास्तव लोक अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी शेअर बाजाराकडे वळत आहेत. बाजारातील तेजीचा अंदाज यावरूनही लावता येतो की, गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत शेअर बाजारातील मिडकॅप कंपन्यांची संख्या जवळपास दुप्पट होऊन 80 वर पोहोचली आहे, ज्यांचे एम-कॅप रु. 1 लाख कोटींहून अधिक आहे. वर्षभरापूर्वी अशा कंपन्यांची संख्या केवळ 48 होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT