digital payment transactions in india rise 13 percent  Sakal
Personal Finance

Digital Payment : डिजिटल व्यवहारांमध्ये तेरा टक्के वाढ

देशभरातील डिजिटल व्यवहारांमध्ये मार्च २०२३ पर्यंत एका वर्षात १३.२४ टक्के वाढ नोंदवली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरातील डिजिटल व्यवहारांमध्ये मार्च २०२३ पर्यंत एका वर्षात १३.२४ टक्के वाढ नोंदवली गेली. मार्च २०२३ मधील ऑनलाइन व्यवहारांवर आधारित आरबीआयचा डिजिटल पेमेंट निर्देशांक ३९५.५७ नोंदवला गेला आहे. तो मार्च २०२२ मध्ये ३४९.३० होता, तर सप्टेंबर २०२२ मध्ये ३७७.६४ होता, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने आज एका निवेदनाद्वारे दिली.

रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, आरबीआय-डीपीआय निर्देशांक सर्व परिमाणांमध्ये वाढला आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात डिजिटल व्यवहारांसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधा (पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर) आणि कामगिरीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

मार्च २०१८ मध्ये संपूर्ण देशात पेमेंटचे डिजिटायझेशन किती प्रमाणात झाले आहे हे जाणून घेण्यासाठी आधार म्हणून संमिश्र आरबीआय- डीपीआय तयार करण्याची घोषणा केली होती.निर्देशांकामध्ये पाच मापदंडांचा समावेश आहे. याद्वारे वेगवेगळ्या कालावधीत देशात डिजिटल पेमेंट्सची व्याप्ती आणि प्रमाणाचे मोजमाप केले जाते.हा निर्देशांक मार्च २०२१ पासून दर चार महिन्यांनी जाहीर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT