Dividend of 6 rupees by LIC share market investment benefits  esakal
Personal Finance

LIC Dividend : ‘एलआयसी’तर्फे सहा रुपयांचा लाभांश

तिमाहीत कंपनीच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असल्याचे कंपनीने आर्थिक निकाल जाहीर करताना सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक २.५ टक्के वाढ नोंदवली असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीतील १३,४२१ कोटी रुपयांच्या तुलनेत तो १३,७६२ कोटी रुपये झाला आहे.

या तिमाहीत कंपनीच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली असल्याचे कंपनीने आर्थिक निकाल जाहीर करताना सांगितले. कंपनीने प्रतिशेअर सहा रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या एकूण अनार्जित कर्जांचे प्रमाण (जीएनपीए) २.०१ टक्के असून, मागील वर्षी ते २.५६ टक्के होते.

नव्या व्यवसायाचे मूल्य ४.६६ टक्क्यांनी वाढून ९५८३ कोटी रुपये झाले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये वैयक्तिक विभागांमध्ये एकूण २.०३ कोटी पॉलिसी विकल्या आहेत. व्यवस्थापनाखालील मालमत्ता मागील वर्षातील ४३.९७ लाख कोटींच्या तुलनेत मार्च २०२४ पर्यंत ५१.२१ लाख कोटींपर्यंत वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT