Plane Travelling  sakal
Personal Finance

Plane Travelling : देशांतर्गत विमान प्रवासी १.३१ कोटीवर ; ‘डीजीसीए’चा अहवाल

देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या जानेवारीत वार्षिक ४.६९ टक्क्यांनी वाढून १.३१ कोटी झाली, तर उशिरा विमान उड्डाणे (दोन तासांहून अधिक) झाल्यामुळे तब्बल ४.८२ लाख प्रवाशांना फटका बसला,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या जानेवारीत वार्षिक ४.६९ टक्क्यांनी वाढून १.३१ कोटी झाली, तर उशिरा विमान उड्डाणे (दोन तासांहून अधिक) झाल्यामुळे तब्बल ४.८२ लाख प्रवाशांना फटका बसला, अशी माहिती विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे.

यामुळे विमान कंपन्यांनाही सुविधांसाठी ३.६९ कोटी रुपये खर्च करावे लागले, जानेवारी २०२३ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहतूक १.२५ कोटी इतकी नोंदवली गेली. विलंबाव्यतिरिक्त, विविध विमान कंपन्यांनी मागील महिन्यात सुमारे १३७४ प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारला होता, त्यामुळे पर्यायी उड्डाण सुविधा, निवास, अल्पोपाहार आणि जेवण प्रदान करण्याव्यतिरिक्त नुकसानभरपाई म्हणून १.२८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. महिन्याभरात उड्डाणे रद्द केल्याबद्दल ६८,३६२ प्रवाशांना नुकसानभरपाई आणि दुसऱ्या विमानाची सुविधा द्यावी लागल्याने १.४३ कोटी रुपयांचा खर्च कंपन्यांना करावा लागला आहे, असेही ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.

देशांतर्गत वाहतुकीच्या आघाडीवर, ‘इंडिगो’चा वाटा ६०.२ टक्के असून, ७९.०९ लाख प्रवाशांची वाहतूक त्यांनी केली. त्यानंतर ‘एअर इंडिया’चा क्रमांक लागतो. त्यांनी या महिन्यात १५.९७ लाख प्रवाशांची वाहतूक केली, त्यांचा बाजार हिस्सा १२.२ टक्के होता. देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवाशांशी संबंधित एकूण ७३२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील ५४.८ टक्के तक्रारी विमान उड्डाण समस्येशी संबंधित होत्या, तर १७.८ टक्के परताव्याबाबतच्या होत्या. याशिवाय, १०.४ टक्के तक्रारी सामानाशी संबंधित आणि ४.७ टक्के तक्रारी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे नोंदविण्यात आल्याचे ‘डीजीसीए’ने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indigo विमानाचं हवेतच इंजिन बंद; २२४ जणांचा जीव टांगणीला, पुढच्या काही मिनिटांत घडलं थरारक

Rocky Flintoff : २० षटकार, ४३ चौकार... अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाचे वादळी शतक... रॉकीने संघाला मिळवून दिला १७४ धावांनी विजय

दादरच्या स्टार मॉलमध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय, २० ते ३० वर्षांच्या ६ तरुणींची सुटका; छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : गदारोळ लोकशाहीसाठी योग्य नाही, लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना झापलं, कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

Gold Price Record High : सोन्याच्या दराचा भडका! दोन दिवसात तब्बल १५ हजारांनी महाग, दरवाढीमागे नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT