Tax Exempt sakal
Personal Finance

राम मंदिर देणगी आणि करबचत

केंद्र सरकारच्या अलीकडील अधिसूचनेमध्ये ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ (PAN: AAZTS6197B) हे ऐतिहासिक व सार्वजनिक उपासनेचे एक ठिकाण म्हणून निर्दिष्ट केले आहे.

डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट

केंद्र सरकारच्या अलीकडील अधिसूचनेमध्ये ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ (PAN: AAZTS6197B) हे ऐतिहासिक व सार्वजनिक उपासनेचे एक ठिकाण म्हणून निर्दिष्ट केले आहे. अनेक देशी व परदेशी नागरिकांनी श्रीराम मंदिराला देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तथापि, ती कशी द्यायची? किती करबचत होईल? याची त्यांना कल्पना नसल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्पष्ट केले आहे, की श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टअंतर्गत अयोध्येतील राम मंदिराची दुरुस्ती, जीर्णोद्धार, पुनर्बांधणी किंवा नूतनीकरणासाठी दिलेल्या देणग्या उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र आहेत.

वजावटीसाठी पात्र आहे का?

प्राप्तिकर कायद्यातील कलम ८०जीच्या तरतुदींनुसार धर्मादाय योगदानाशी संबंधित करलाभांच्या पात्रतेचे मूल्यांकन सुलभ होऊ शकते. तथापि, कर विभागाच्या निकषांचे पालन करण्यासाठी व्यक्तीच्या प्रमाणन स्थितीची पडताळणी करणे आवश्यक आहे.

देणगीदाराचा फायदा

श्रीराम मंदिरासाठी दिलेली देणगीची रक्कम तुमच्या समायोजित एकूण उत्पन्नाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, १० टक्के मर्यादेपेक्षा जास्तीची रक्कम वजावटीसाठी पात्र होणार नाही. जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडणारे करदातेच ही वजावट मिळविण्यास पात्र आहेत. ज्यांनी नवी करप्रणाली निवडली आहे, त्यांना ही वजावट मिळणार नाही. रोख किंवा चेकद्वारे दिलेल्या देणग्यांसाठी उत्पन्नातून वजावटीची मागणी करता येऊ शकते. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम ८० जी (२)(बी) अंतर्गत देणगीची रक्कम करदात्याच्या उत्पन्नातून ५० टक्के वजावटीसाठी पात्र असल्याचे सरकारने सूचित केले आहे.

कोण देणगी देऊ शकतो?

व्यक्ती, कंपन्या, फर्म, एलएलपी आदींसह निवासी आणि अनिवासी दोन्ही करदात्यांच्या सर्व श्रेणींना देणगी देता येईल.

अंतिम मुदत आहे का?

आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून या सार्वजनिक न्यासास दिलेल्या देणग्या उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र आहेत. अयोध्येतील मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची २२ जानेवारी २०२४ ही औपचारिक तारीख होती. तथापि, ही तारीख कलम ८० जी अंतर्गत वजावटीशी संबंधित नाही. म्हणून, २२ जानेवारीपूर्वी किंवा नंतर देणगी दिली असली, तरीही इतर अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून करदाता त्या-त्या आर्थिक वर्षाच्या करविवरणपत्रामध्ये अशा देणगीची वजावटीसाठी मागणी करू शकतो.

देणगी पावती कशी मिळेल?

देणगीदाराला ई-मेलद्वारेदेखील पावती मिळेल, असे ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा’च्या संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले आहे. देणगीदार पावती डाउनलोडदेखील करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT