Investment sakal
Personal Finance

ठेवींवर मिळवा भरघोस व्याज

प्रत्येक गुंतवणूकदार नेहमीच जास्तीतजास्त परतावा कसा मिळविता येईल, यासाठी प्रयत्नशील असतो. कमी जोखीम आणि अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांची अनेकांना माहिती नसते.

सुधाकर कुलकर्णी

प्रत्येक गुंतवणूकदार नेहमीच जास्तीतजास्त परतावा कसा मिळविता येईल, यासाठी प्रयत्नशील असतो. कमी जोखीम आणि अधिक परतावा देणाऱ्या पर्यायांची अनेकांना माहिती नसते. बहुतांश गुंतवणूकदार सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारा पर्याय म्हणून बँक किंवा पोस्टात ठेवी ठेवण्यास प्राधान्य देतात. मात्र, बँक किंवा पोस्टापेक्षा एक ते दीड टक्के अधिक व्याज देणारे व जोखीमही कमी असणारे ठेवींचे पर्यायही उपलब्ध आहेत.

सध्या काही प्रमुख बिगरबँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) एक ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी ठेवींच्या माध्यमातून भांडवल उभारणी करीत आहेत. ठेवींवर त्या गुंतवणूकदारांना सुमारे आठ ते साडे नऊ टक्के दराने व्याज देत आहेत.

1) श्रीराम फायनान्स : कंपनी ५० व ६० महिन्यांच्या मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिक महिलांसाठी ९.४० टक्के व्याजदर देते, तर जेष्ठ नागरिक पुरुषांसाठी ९.३० टक्के आणि इतरांसाठी ८.८ टक्के दराने व्याज देत आहे.

2) मुथूट कॅपिटल : एक ते पाच वर्षे मुदतीच्या ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.७१ टक्के ते ८.८८ टक्के दराने, तर इतरांसाठी ७.२१ टक्के ते ८.३८ टक्के व्याजदर आहे.

3) बजाज फायनान्स : एक वर्षे ते पाच वर्षे मुदतीच्या ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.६५ टक्के ते ८.८५ टक्के, तर इतरांसाठी ७.४० टक्के ते ८.६० टक्के व्याज देत आहे.

4) महिंद्र फायनान्स : एक वर्षे ते पाच वर्षे मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के ते ८.३० टक्के दराने व्याज देत आहे, तर इतरांसाठी ७.४० टक्के ते ८.०५ टक्के वार्षिक व्याज देत आहे.

5) सुंदरम् होम फायनान्स : एक ते पाच वर्षे मुदतीच्या ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना ७.९५ टक्के ते ८.२५ टक्के, तर इतरांसाठी ७.४५ टक्के ते ७ टक्के व्याजदर देत आहे.

वरील पाच कंपन्यापैकी बजाज फायनान्स, महिंद्र फायनान्स व सुंदरम होम फायनान्स या तीन कंपन्याचे क्रेडिट रेटिंग ‘एएए/स्टेबल’ असे आहे. हे मानांकन गुंतवणूक जास्तीत जास्त सुरक्षित असून, व्याजही वेळेतच दिले जाईल, असे दर्शविते. श्रीराम फायनान्स कंपनीचे रेटिंग ‘एए प्लस’, तर मुथूट कॅपिटलचे रेटिंग ‘ए प्लस’ असे आहे. हे दोन्हीही मानांकन गुंतवणूक सुरक्षित असल्याचे दर्शवितात; तसेच व्याजही वेळेवर दिले जाईल, असे दर्शवितात.

हे मानांकन गुंतवणुकीतील सुरक्षितता व जोखीम दर्शवितात मात्र, ती हमी नसते हे गुंतवणूकदाराने लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात, लहान सहकारी बँका, पतपेढ्या यातील गुंतवणुकीच्या तुलनेने ‘एनबीएफसी’मधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची आणि यावर मिळणारे व्याजही जास्त असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT