ED attaches properties worth rs 24.95 cr of Hero MotoCorp chairman Pawan Munjal  Sakal
Personal Finance

Hero MotoCorp: हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्यावर ईडीची कारवाई, 24.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Hero MotoCorp: 24.95 कोटी रुपयांच्या तीन मालमत्ता जप्त

राहुल शेळके

Hero MotoCorp: ईडीने हीरो मोटोकॉर्पचे सीएमडी आणि चेअरमन पवन मुंजाळ यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पवन मुंजाळ यांच्या 3 मालमत्ता जप्त केल्या आहेत. एक्स (ट्विटर) वर माहिती देताना ईडीने सांगितले की, या मालमत्तांची किंमत 24.95 कोटी रुपये आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची 50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पवन मुंजाळ यांनी बेकायदेशीरपणे 54 कोटी रुपये देशाबाहेर नेल्याचा आरोप आहे, त्यानंतर डीआरआय आणि ईडीने ही कारवाई केली आहे.

यापूर्वी 1 ऑगस्ट 2023 रोजी एजन्सीने दिल्ली आणि गुरुग्राममधील मुंजाळ यांच्या 12 ठिकाणांवर छापे टाकले होते, ज्यामध्ये 25 कोटी रुपयांचे विदेशी चलन, सोने आणि दागिने जप्त करण्यात आले होते.

डीआरआयने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे एजन्सीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याअंतर्गत छापा टाकण्यात आला होता. डीआरआयने पवन मुंजाळ, अमित बाली, हेमंत दहिया आणि केआर रमण यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

कोण आहेत पवन मुंजाळ?

पवन मुंजाळ हे हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष, सीईओ आणि एमडी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सदस्य देखील आहेत. इंडिया टुडे मासिकाने 2017 च्या भारतातील 50 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत 69 वर्षीय पवन मुंजाळ हे 49 व्या स्थानावर होते.

देहरादून  स्कूल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुरुक्षेत्र येथून शिक्षण पूर्ण केलेल्या पवन यांनी 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला हीरो होंडा मोटर्समध्ये संचालक म्हणून प्रवेश केला. त्यांना 2001 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बढती मिळाली.

पवन मुंजाळ यांंच्या नेतृत्वाखाली कंपनीचा जगभरातील 40 देशांमध्ये विस्तार झाला आहे आणि हिरो सध्या 100 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीसह व्हॉल्यूमनुसार जगातील सर्वात मोठी दुचाकी वाहन उत्पादक कंपनी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

Mira-Bhayandar: तो हिंदी भाषिक व्यापारी नडला म्हणून मनसे कार्यकर्ता भिडला, 'त्या' व्हायरल व्हिडिओमागची स्टोरी काय?

SCROLL FOR NEXT