ED searches realty major DLF in money laundering case against Supertech  Sakal
Personal Finance

PMLA: ईडीची मोठी कारवाई! सुपरटेकविरोधातील मनी लाँड्रिंगचा तपास डीएलएफपर्यंत पोहोचला

Supertech Money Laundering Case: ईडीने गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवाईत अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.

राहुल शेळके

Supertech Money Laundering Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात रिअल इस्टेट फर्म सुपरटेक आणि तिच्या प्रवर्तकांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या वतीने गुरुग्राममध्ये प्रमुख रियल्टी कंपनी डीएलएफच्या परिसराची झडती घेण्यात आली आहे. ईडीने गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवाईत अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सुपरटेकविरोधात ईडीच्या तपासाशी संबंधित आहे.

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पोलीस विभागांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांखाली सुपरटेक लिमिटेड आणि तिच्या समूह कंपन्यांविरुद्ध 670 घर खरेदीदारांची 164 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

सुपरटेक ग्रुपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे ईडीने म्हटले होते. घरांचा ताबा ग्राहकांना वेळेवर देण्याची जबाबदारी पूर्ण करण्यात बिल्डर अपयशी ठरले. सुपरटेक ग्रुपने 2013-14 मध्ये गुरूग्राममध्ये जास्त किंमतीत जमीन खरेदी करण्यासाठी ग्राहक आणि घर खरेदीदारांकडून मिळालेले 440 कोटी रुपये लुटले, तर नोएडामधील प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.

याबाबत डीएलएफला ई-मेलद्वारे विचारणा करण्यात आली होती. मात्र यासंदर्भात डीएलएफकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या प्रकरणी ईडीने जूनमध्ये सुपरटेकचे प्रवर्तक राम किशोर अरोरा (आरके अरोरा) यांना अटक केली होती.

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे 164 कोटी रुपयांच्या 670 गृहखरेदीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सुपरटेक लिमिटेड आणि तिच्या समूह कंपन्यांविरुद्ध दिल्ली, हरियाणा आणि यूपी पोलिस विभागांनी नोंदवलेल्या 26 एफआयआरशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Dhanashree Verama: युझवेंद्र चहलच्या 'Sugar Daddy' टी शर्टवर धनश्रीची जोरदार टीका; म्हणाली, मी कोर्टात रडले आणि तो...

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT