Edtech Major Byjus Shuts All Offices in India Asks Employees to Work From Home Sakal
Personal Finance

BYJU'S : ‘बायजूज’ची देशभरातील सर्व कार्यालये बंद

आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बायजूज’ने खर्च कमी करण्यासाठी देशभरातील आपली सर्व कार्यालये बंद केली आहेत. कंपनीचे केवळ बंगळूरमधील मुख्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘बायजूज’ने खर्च कमी करण्यासाठी देशभरातील आपली सर्व कार्यालये बंद केली आहेत. कंपनीचे केवळ बंगळूरमधील मुख्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरातील ३०० केंद्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळासाठी घरून काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हा निर्णय ‘बायजूज इंडिया’चे सीईओ अर्जुन मोहन यांच्या कंपनीच्या पुनर्रचना योजनेचा एक भाग आहे. रोख रकमेच्या टंचाईवर मात करण्यासाठी कंपनीने निर्णय घेतला आहे. नुकत्याच २० कोटी रुपयांच्या राइट्स इश्यूद्वारे उभारलेल्या निधीची वैधता आणि वापर यावरून कंपनी वादात सापडलेली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनी सहा महिन्यांहून अधिक काळ या योजनेवर काम करत होती. भाडेतत्त्वाची मुदत संपताच कार्यालये बंद करण्यात येत आहेत. दरम्यान, सर्व कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरित पगाराचा काही भाग दिला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. राइट इश्यूमधून उभारलेल्या पैशाचा वापर करण्यास सक्षम होताच उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

Mundhwa Land Scam : शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीला समन्स; खारगे समितीपुढे सुनावणी, व्यवहाराची इत्थंभुत माहिती घेणार

Rising Star Asia Cup 2025 : भारत 'अ' संघाचा ओमान 'अ' संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय, सेमिफानलचं तिकीट केलं पक्क...

Latest Marathi Breaking News Live Update : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा संताप उसळला: मदत वाटपातील विषमतेविरोधात वैजापूरमध्ये उपोषण

Ajit Pawar : मिळकतकराचा तिढा दोन दिवसांत सुटणार; समाविष्ट गावांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे अजित पवार यांचे आदेश

SCROLL FOR NEXT