EI Nino GDP Impact Sakal
Personal Finance

EI Nino GDP Impact: एल निनोचा फटका भारताच्या GDP बसरणार, काय आहे कारण?

अल निनोचा परिणाम केवळ हवामानापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे.

राहुल शेळके

EI Nino GDP Impact: सध्या जवळपास संपूर्ण देश उन्हाने हैराण झाला असून मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा अनेक भागात आहे. यंदा मान्सूनला उशीर झाला आहे. मान्सूनच्या विलंबाचे कारण एल निनो हा घटक आहे.

याहून त्रासदायक बाब म्हणजे या अल निनोचा परिणाम केवळ हवामानापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. त्यामुळे भारताबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

आशिया खंडात भारताचा सर्वाधिक प्रभाव

नोमुरा अहवालानुसार एल निनो 2023 मुळे आशिया खंडात इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था सर्वात जास्त प्रभावित होऊ शकते. यामुळे अर्थव्यवस्थेची चाके मंदावतीलच, पण त्याचबरोबर महागाईचा प्रभावही वाढू शकतो.

अल निनोमुळे भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात 0.4 टक्क्यांनी घसरण्याची भीती व्यक्त केली आहे, तर महागाई 0.3 टक्क्यांनी वाढू शकते.

विकास दर इतका कमी राहू शकतो

चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 6 टक्क्यांच्या खाली येण्याची भीती नोमुराला वाटते, जी मागील आर्थिक वर्षात 7 टक्क्यांच्या वर होती.

चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 5.9 टक्के अपेक्षित आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्के दराने वाढली होती.

नोमुराचे अर्थतज्ञ ऑरोदीप नंदी आणि सोनल वर्मा यांचे मत आहे की, भारत खाद्यपदार्थांच्या बाबतीत आयातीपेक्षा जास्त निर्यात करतो त्यामुळे महागाईचा परिणाम फारसा होणार नाही.

नोमुरा अहवालाच्या मते, एल निनोचा तीव्र परिणाम झाल्यास महागाई 0.3 टक्क्यांनी वाढू शकते आणि एल निनोचा प्रभाव सौम्य असल्यास महागाई दर फक्त 0.1 टक्क्यांनी वाढू शकतो. चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5 टक्क्यांच्या खाली राहण्याचा अंदाज आहे.

असा असू शकतो प्रभाव

अल निनोचा प्रभाव सौम्य असला तरी भारताचा आर्थिक विकास दर 0.2 टक्क्यांनी घसरू शकतो, असे नोमुराचा अहवाल सांगतो. नोमुराची ही भीतीही चुकीची नाही.

कारण भारतातील कृषी क्षेत्राचा जीडीपीमध्ये अजूनही मोठा वाटा आहे आणि हे क्षेत्र पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे. मान्सूनला उशीर झाल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या असून पुढील रब्बी हंगामात एल निनोचा अधिक परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT