Electoral Bond is biggest scam in the world says Nirmala Sitharaman husband Economist Parakala Prabhakar  Sakal
Personal Finance

Electoral Bond: 'इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वात मोठा घोटाळा', निर्मला सीतारामन यांच्या पतीचे वक्तव्य चर्चेत

Electoral Bond: इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर सतत टीका करत आहे. यातच आता विरोधी पक्षाने अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राहुल शेळके

Electoral Bond: इलेक्टोरल बाँडच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष भाजपवर सतत टीका करत आहे. यातच आता विरोधी पक्षाने अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर यांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

काँग्रेसचा दावा आहे की, परकला यांनी इलेक्टोरल बाँड केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे असे म्हटले आहे. सीतारामन यांच्या पतीने सरकारला आरसा दाखवला आहे असा काँग्रेसचा दावा आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीने एका मीडिया चॅनेलला दिलेल्या निवेदनात इलेक्टोरल बाँडवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, इलेक्टोरल बाँडचा मुद्दा भाजपला राजकीयदृष्ट्या महागात पडणार आहे.

केरळ वृत्तवाहिनी रिपोर्टर टीव्हीशी बोलताना परकला प्रभाकर म्हणाले की, हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे, हे आता सर्वांना समजू लागले आहे. या प्रकरणामुळे सरकारला देशातील मतदारांकडून कठोर शिक्षा होईल, असे ते म्हणाले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर कोण आहेत?

अर्थमंत्र्यांचे पती परकला प्रभाकर हे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी 2014 ते 2018 या काळात आंध्र प्रदेश सरकारमध्ये कम्युनिकेशन सल्लागार म्हणून काम केले. ('Electoral Bond Issue Biggest Scam In World': Sitharaman's Husband)

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील नरसापुरम येथे 2 जानेवारी 1959 रोजी जन्मलेल्या परकला प्रभाकर यांनी 1991 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत.

कोणत्या चार पक्षांना सर्वाधिक देणग्या मिळाल्या?

12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँडमधून किती देणग्या मिळाल्या याचा तपशील स्टेट बँकेने प्रथम निवडणूक आयोगाला सादर केला. यानंतर आयोगाने तो आपल्या वेबसाइटवर सार्वजनिक केला. (Electoral Bond is biggest scam in the world says Nirmala Sitharaman husband Economist Parakala Prabhakar)

भाजपला सर्वाधिक 6,986.5  कोटी रुपये मिळाले. पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस 1,397 कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला 1,334 कोटी रुपये मिळाले. भारत राष्ट्र समिती (BRS) 1,322 कोटींसह चौथ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT