Elon Musk confirms tesla will come to india after meeting PM Modi Elon Musk Net Worth increased  
Personal Finance

PM Modi in US : टेस्ला भारतात येणार! PM मोदींना भेटताच मस्कवर पैशांचा पाऊस; एकाच दिवसात 'इतकी' वाढली संपत्ती

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि मंगळवारी त्यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची भेट घेतली. या भेटीत जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या भारतात एंट्रीबद्दल चर्चा झाली. या भेटीनंतर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी टेस्ला भारतात दाखल होण्याबद्दल मोठा दावा केला आहे.

न्यूयॉर्क पॅलेस हॉटेले येथे इलॉन मस्क यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कंपनी लवकरच भारतात गुंतवणूक करणार आहे आणि देशाच्या विकासाकरिता ही महत्वाची बाब असणार आहे.

मोदींची भेट घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी भारतात गुंतवणूक करणार असल्याबद्दल माहिती दिली, तसेच त्यांनी पुढील वर्षी भारताला भेट देण्याचा प्लॅन असल्याचे देखील सांगितले. थसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले तसेच लवकरच नवीन घोषणा करण्यात

इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर भारतात गुंतवणूक करण्याच्या योजनेची पुष्टी करताना सांगितले की, मी स्वत: पुढच्या वर्षी भारताला भेट देण्याचा योजना आखत आहे आणि टेस्ला भारतात येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या बाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो आणि आशा करतो का नजीकच्या भविष्यात आम्ही काहीतरी जाहीर करू शकू.

ही भारतासोबतच्या आमच्या संबंधांमध्ये ही एक महत्वपूर्ण गुंतवणूक असेल. पुढे बोलताना इलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदी भारताची खरंच काळडी करतात. मी मोदींचा फॅन आहे असं म्हटलं आहे.

दरम्यान मंगळवारी इलॉन मस्क आणि पंतप्रधान मोदी यांच्या न्यूयॉर्कच्या पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या भेटीचा परिणाम शेयर मार्केटवर देखील दिसून आला. या भेटीनंतर टेस्ला इंक चे शेयर ५.३५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याचा थेट परिणाम इलॉन मस्क यांच्या संपत्तीवर झाला आहे.

टेस्लाच्या शेयर्समध्ये झालेल्या या मोठी वाढीमुळे एका दिवसात इलॉन मस्क यांच्या संपत्तीत ९.९५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८१,००० कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली. इलॉन मस्क यांची संपत्ती २४३ अब्ज डॉलर झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT