Elon Musk Plans To Turn X Into A Bank You Won't Need An Account  Sakal
Personal Finance

Elon Musk: इलॉन मस्कच्या नव्या प्लॅनमुळे बँकांना मोठा धक्का! खाते सांभाळण्याची डोकेदुखी संपणार

Musk Bank Plan for X: कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मस्कने ही माहिती दिली.

राहुल शेळके

Musk Bank Plan for X: इलॉन मस्कने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना एका वर्षानंतर बँक खात्याची गरज भासणार नाही, कारण X हे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जीवनाचे केंद्र बनेल. ग्राहकांच्या पैशांशी संबंधित सर्व बाबी X प्लॅटफॉर्मद्वारे हाताळल्या जातील, असे मस्कने म्हटले आहे.

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी रात्री कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मस्क म्हणाले की, लोकांना याचे आश्चर्य वाटेल. या बैठकीला उपस्थित असलेल्या समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी सांगितले की, पुढील वर्षी ही सुविधा प्रत्यक्षात येऊ शकते.

डेटिंग अॅपवरही चर्चा

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, X पुढील वर्षापासून डेटिंग अॅपवरही इलॉन मस्क काम करत आहेत. कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी एका व्हिडिओ कॉल दरम्यान हे सांगितले ज्यामध्ये आणखी दोन लोक देखील उपस्थित होते.

मस्क X च्या भविष्याबद्दल खूप उत्साहित आहे आणि त्यांना अॅपमध्ये सर्व काही आणायचे आहे जेणेकरून लोक त्यांची सर्व कामे एकाच अॅपवरून करू शकतील. मस्कला Xला चीनच्या WeChat सारखे बनवायचे आहे, जे लोकांना पेमेंट, खरेदी, वाहतूक इत्यादी सुविधा पुरवेल.

क्रेडिट कार्डला देणार पर्याय

इलॉन मस्क वापरकर्त्यांना सध्याच्या बँकिंग प्रणालीसह महागड्या क्रेडिट कार्डला एक चांगला पर्याय देण्याचा विचार करत आहे. मस्क म्हणाले होते की, X वर सकारात्मक खाती असलेल्या वापरकर्त्यांना अधिक व्याज देईल आणि लाल खाती असलेल्या वापरकर्त्यांकडून कमी व्याज आकारेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT