Elon Musk Sakal
Personal Finance

Elon Musk : इलॉन मस्कचा मोठा निर्णय, ट्विटरची भारतातील तीनपैकी दोन कार्यालये करणार बंद, कर्मचाऱ्यांना...

आता कंपनीचे भारतात फक्त एकच कार्यालय आहे.

सकाळ डिजिटल टीम

Elon Musk Twitter CEO : ट्विटरने अलीकडेच भारतातील 90 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे, त्यांनी देशातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केली आहेत. कंपनीचे भारतात सुमारे 200 कर्मचारी होते. अलीकडील कर्मचारी कपातीनंतर, कार्यालयांमध्ये जास्त कर्मचारी उरलेले नव्हते. (Twitter Shuts Two Of Three India Offices)

रिपोर्टनुसार, ट्विटरने उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या निर्णयाचा एक भाग आहे.

बंद करण्यात आलेली दोन कार्यालये दिल्ली आणि आर्थिक केंद्र मुंबईत होती. आता कंपनीचे भारतात फक्त एकच कार्यालय आहे. ते बेंगळुरूच्या दक्षिणेकडील टेक हबमध्ये आहे.

कर्मचार्‍यांना दिलेल्या अंतर्गत ईमेलमध्ये, Twitter ने म्हटले होते की, “ट्विटरला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, आम्ही शुक्रवारी जगातील अनेक कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेत आहोत.

याचा परिणाम अनेक व्‍यक्‍तींवर होईल ज्यांनी Twitter साठी अमूल्य योगदान दिले आहे, परंतु कंपनीला सक्षम करण्यासाठी दुर्दैवाने हा निर्णय घ्यावा लागत आहे.”

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यापासून केवळ भारतातच नाही, तर जगभरातील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे आणि कार्यालये बंद केली आहेत. मस्कच्या म्हणण्यानुसार, ''2023 मध्ये ट्विटरला आर्थिकदृष्ट्या स्थिर बनवण्याचे उद्दिष्ट आहे.''

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दरम्यान, मस्क यांनी म्हटले आहे की, ''कंपनीला स्थिर करून आणि आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनवल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस ते ट्विटरचे सीईओ पद सोडू शकतात. मला कोणत्याही कंपनीचे सीईओ बनायचे नाही, मग ते टेस्ला असो किंवा ट्विटर.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT