Union Budget 2024  Sakal
Personal Finance

Budget 2024: रोजगार वाढण्यासाठी मोदी सरकार देणार 2 लाख कोटी...? अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितला प्लॅन

Union Budget 2024-25 Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आहे. यात त्यांनी रोजगार वाढण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

राहुल शेळके

Budget 2024 Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग सातवा अर्थसंकल्प सादर करून इतिहास रचला आहे. यात त्यांनी रोजगार वाढण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. रोजगार वाढवण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी संशोधनात बदल करणे आवश्यक आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, संपूर्ण वर्ष आणि त्यापुढील काळ लक्षात घेऊन, या अर्थसंकल्पात आम्ही विशेषतः रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत.

5 वर्षांच्या कालावधीत 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना जाहीर करताना मला आनंद होत आहे. यासाठी केंद्राचा खर्च दोन लाख कोटी रुपये आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, भारतीय जनतेने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था चमकत आहे.

अर्थमंत्र्यांनी 9 कलमी योजना मांडली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, विकसित भारतासाठी आमची पहिली प्राथमिकता कृषी क्षेत्रातील उत्पादकता आहे. दुसरे प्राधान्य म्हणजे रोजगार आणि कौशल्ये. तिसरे प्राधान्य सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय आहे, चौथे प्राधान्य उत्पादन आणि सेवा आहे.

पाचवे प्राधान्य शहरी विकासाला आहे. सहावे प्राधान्य ऊर्जा सुरक्षा आहे. सातवे प्राधान्य म्हणजे पायाभूत सुविधा आणि आठवे प्राधान्य नवकल्पना, संशोधन आणि विकास आणि नववे प्राधान्य म्हणजे पुढच्या पिढीतील सुधारणा. या प्राधान्यांच्या आधारे अर्थसंकल्प तयार केला.

अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

- मोफत रेशनची व्यवस्था 5 वर्षे सुरू राहील.

- यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद.

- रोजगारासाठी सरकार 3 मोठ्या योजनांवर काम करणार आहे.

- बिहारमध्ये 3 एक्सप्रेसवेची घोषणा.

- बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.

- पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.

- विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.

- प्रथमच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ

- नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT