Mutual Fund Investment  Sakal
Personal Finance

Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडांत मार्चमध्ये घट; दुसऱ्या महिन्यात १९,००० कोटींची गुंतवणूक

म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीसाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात ‘एसआयपी’लाच पहिली पंसती असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इक्विटी म्युच्युअल फंडांच्या स्मॉल कॅप फंडांमधून मार्च महिन्यात, गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रथमच गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले असून, मिड कॅप फंडांमधील गुंतवणूकही घटली असल्याचे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (अॅम्फी) अहवालात म्हटले आहे.

म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीसाठी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात ‘एसआयपी’लाच पहिली पंसती असल्याचेही या अहवालावरून स्पष्ट झाले. सलग दुसऱ्या महिन्यात ‘एसआयपी’द्वारे १९,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

‘एसआयपी’तून फेब्रुवारीमध्ये १९,१८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. मार्च महिन्यात ती १९,२७१ कोटी रुपये झाली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये मार्चमध्ये एकूण २२,६३३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, ती फेब्रुवारीमध्ये २६,८६६ कोटी रुपये होती.

म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत मार्चमध्ये दोन टक्क्यांनी घसरण झाली असून, ती ५३.१२ लाख कोटी रुपये आहे. मार्चमध्ये १९ नव्या योजना दाखल झाल्या, त्यात ३,८२७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

इक्विटी म्युच्युअल फंडांची स्मॉल कॅप श्रेणी वगळता अन्य सर्व श्रेणींमध्ये गुंतवणूक झाली. मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडांत १.८४ लाख कोटी रुपयांची भर पडली. स्मॉल कॅप फंडातून मार्चमध्ये ९४ कोटी रुपयांचा निधी बाहेर पडला.

याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये स्मॉल कॅप फंडांतून २४९ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये २,९२२.४५ कोटी रुपयांचा ओघ आला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक व ‘सेबी’ने मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या वाढलेल्या मूल्याकंनाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली, परिणामी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेण्यावर भर दिला, असे ‘अॅम्फी’ने म्हटले आहे.

गुंतवणुकीची आकडेवारी

  • लार्ज कॅप फंडांत २,१२८ कोटी, १३१ टक्क्यांनी वाढ

  • मिड कॅप फंडात १,८२७ कोटी रुपये गुंतवणूक

  • लार्ज अँड मिड कॅपमध्ये ३,२१५ कोटी रुपयांचा ओघ

  • थीमॅटिक फंडामध्ये सर्वाधिक ७,९१७ कोटी रुपयांचा निधी

  • डेट फंडांमधून सर्वाधिक १.९८ लाख कोटी गुंतवणूक बाहेर

  • लिक्विड फंडांमधून विक्रमी १.५७ लाख कोटींचा निधी काढला

  • हायब्रिड फंडात ६९ टक्के घट, केवळ ५५८३ कोटी रुपयांचा ओघ

  • ‘ईटीएफ’मध्ये १०,५५९ कोटी, ‘गोल्ड ईटीएफ’मध्ये ३७३ कोटी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT