ETF funs A great investment option ETF fund similar to an index fund of mutual fund SAkal
Personal Finance

‘ईटीएफ’ : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

गुंतवणुकीसाठी प्रत्येक जण उत्तम पर्यायाच्या शोधात असतो. त्यादृष्टीने गुंतवणुकीसाठी एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’ हा एक चांगला पर्याय आहे.

सुधाकर कुलकर्णी

गुंतवणुकीसाठी प्रत्येक जण उत्तम पर्यायाच्या शोधात असतो. त्यादृष्टीने गुंतवणुकीसाठी एक्स्चेंज ट्रेडेड फंड अर्थात ‘ईटीएफ’ हा एक चांगला पर्याय आहे. ‘ईटीएफ’ म्हणजे नेमके काय? यातील गुंतवणुकीचे फायदे याबाबत थोडक्यात माहिती घेऊ. ‘ईटीएफ’ हा म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंडासारखाच फंड असतो.

याची खरेदी-विक्री शेअर बाजारात करता येते. याच्या एका युनिटची बाजारातील किंमत ‘अंडरलाईंग ॲसेट’च्या किमतीनुसार कमी-अधिक होत असते. ‘ईटीएफ’साठी शेअर, रोखे, सोने, चलन यांसारखे ‘अंडरलाईंग ॲसेट’ विचारात घेतले जातात. ‘ईटीएफ’ युनिटची खरेदी-विक्री शेअर बाजारात होत असल्याने यात गुंतवणूक करण्यासाठी बँक खाते, डी-मॅट खाते व ब्रोकरकडे खाते असणे आवश्यक आहे. खरेदी-विक्री केलेल्या ‘ईटीएफ’ युनिटची नोंद आपल्या डी-मॅट खात्यात होत असते.

गुंतवणुकीचे फायदे

कर आकारणी ः ‘ईटीएफ’वरील भांडवली लाभ (कॅपिटल गेन) ‘ईटीएफ’ युनिटची प्रत्यक्ष विक्री केली जाते तेव्हाच विचारात

घेऊन, त्यावर करआकारणी केली जाते. मात्र, म्युच्युअल फंडातील शेअरची खरेदी-विक्री वेळोवेळी सुरू असल्याने त्यावर होणारी करआकारणी ‘ईटीएफ’पेक्षा अधिक असल्याने परतावा काही प्रमाणात कमी होतो.

तरलता अधिक ः ‘ईटीएफ’ युनिटचे शेअरप्रमाणे ‘डे-ट्रेडिंग’ करता येऊ शकते. यामुळे यात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या तुलनेने अधिक तरलता (लिक्विडिटी) असते. म्युच्युअल फंड युनिटची खरेदी-विक्री दिवसाच्या क्लोजिंग प्राईसनुसार होत असते, त्यामुळे त्यात हा फायदा मिळत नाही.

मॅनेजमेंट चार्जेस कमी ः

‘ईटीएफ’चे फंड मॅनेजमेंट चार्जेस व एक्स्पेंस रेशो म्युच्युअल फंडाच्या तुलनेने कमी असल्याने परतावा जास्त मिळू शकतो.

सुलभ गुंतवणूक ः ‘ईटीएफ’मध्ये शेअर, सोने, चांदी, चलन (करन्सी) यांची सहजपणे खरेदी-विक्री करता येते. प्रत्यक्ष सोने-चांदी घेण्यापेक्षा ‘ईटीएफ’च्या माध्यमातून सोने किंवा चांदीत गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर ठरते.

महत्त्वाचे निकष

१) मॉर्निंग स्टार रेटिंग, २) गेल्या तीन वर्षांतील परतावा, ३) हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम, ४) लो ट्रॅकिंग एरर आणि ५) लो टोटल एक्स्पेंस रेशो या निकषांनुसार ‘ईटीएफ’ची निवड केल्यास ‘पॅसिव्ह इन्व्हेस्टर’सुद्धा (निष्क्रिय गुंतवणूकदार) चांगला परतावा मिळवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT