Experts believe that Axis Bank shares will go up to Rs 1250 sakal
Personal Finance

Axis Bank Share :ऍक्सिस बँकेचे शेअर्स 1250 रुपयांपर्यंत जाण्याचा तज्ज्ञांना विश्वास...

खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेत (Axis Bank) सध्या करेक्शन सुरू आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात शेअर 1 टक्क्यांहून अधिक घसरला.

सकाळ वृत्तसेवा

Axis Bank : खासगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेत (Axis Bank) सध्या करेक्शन सुरू आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात शेअर 1 टक्क्यांहून अधिक घसरला. या करेक्शन दरम्यान, ऍक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये खरेदीची चांगली संधी आहे.

ब्रोकरेज फर्म नोमुरा ॲक्सिस बँकेबाबत बुलिश आहे आणि त्यांनी 17-18 टक्के अपसाइडसाठी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर मागच्या वर्षाच्या कामगिरीवर नजर टाकली तर, या स्टॉकमध्ये सुमारे 28 टक्के वाढ दिसून आली आहे.

नोमुराने ॲक्सिस बँकेवर बाय रेटींगसह 1250 रुपये टारगेट निश्चित केले आहे. सध्य हा शेअर 1058 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच ध्याच्या किंमतीपेक्षा स्टॉक सुमारे 17 टक्क्यांनी वाढू शकतो.

गेल्या 5 दिवसात या शेअरमध्ये 6 टक्क्यांहून अधिक करेक्शन झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,151.50 रुपये आणि निचांक 814.25 रुपये आहे. बीएसईवरील स्टॉकचे मार्केट कॅप 3.21 लाख कोटीपेक्षा जास्त आहे.

ॲक्सिस बँकेचे शेअर्स गेल्या वर्षभरात सुमारे 27 टक्क्यांनी वाढले आहेत. तर 2 वर्षांत शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 50 टक्के परतावा दिला आहे. लाँग टर्ममध्ये हा शेअर दमदार परतावा देऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या घसरणीच्या काळात या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT