Shaktikant Das Sakal
Personal Finance

Inflation : महागाईविरुद्धची लढाई संपलेली नाही - शक्तीकांत दास

सध्या महागाईचा दर कमी झाला असून, आगामी काळात ती ४.७ टक्क्यांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा असली तरी त्यावर संतुष्ट न होता, महागाईविरुद्धची लढाई सुरूच राहील.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - सध्या महागाईचा दर कमी झाला असून, आगामी काळात ती ४.७ टक्क्यांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा असली तरी त्यावर संतुष्ट न होता, महागाईविरुद्धची लढाई सुरूच राहील, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज येथे स्पष्ट केले. भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) कार्यक्रमात ते बोलत होते.

अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. यापुढील काळात महागाई दर आणखी कमी नोंदवला जाऊ शकतो, मात्र रिझर्व्ह बँक तेवढ्यावर संतुष्ट राहणार नाही. महागाई कमी करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही दास यांनी दिली.

महागाईची दरवाढ आधी सौम्य होती, परंतु अचानक उद्भवलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती बदलली. जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आला आणि जागतिक पातळीवर वस्तूंच्या किंमती वाढल्या. त्यामुळे महागाई वाढतच गेली. आता परिस्थिती सुधारत आहे. चलनवाढ कमी झाली आहे, ‘जीडीपी’ वाढ कायम आहे आणि चालू खात्यातील तूट आटोक्यात आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान असलेली ढोबळ अनुत्पादित मालमत्तेची टक्केवारी कमी होत आहे. बँकांमधील कर्जाची मागणीदेखील १५.५ टक्के झाली आहे, या सगळ्या बाबी सकारात्मक आहेत; तसेच लोकसंख्या हीदेखील भारतासाठी मोठी संधी आहे. या बळावर देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात ६.५ टक्क्यांपर्यंत जाईल, असा विश्वास दास यांनी व्यक्त केला.

अर्थव्यवस्थेच्या वाढीला भू-राजकीय आघाडीवर होणारे बदल, निर्यातीतील मंदी, एल निनो यासारखे धोकेही अडथळे ठरू शकतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या सगळ्या पार्श्वभूमीवर, आरबीआय सक्रिय, सतर्क राहील आणि देशाची आर्थिक स्थिरता राखण्यासाठी अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही दास यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT