August Economic Review Sakal
Personal Finance

Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...

Economic Review Report: आर्थिक आढावा अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

राहुल शेळके

Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल जारी केला आहे. या अहवालात असे म्हटले आहे की देशाच्या आर्थिक विकासाचा वेग चांगला आहे, खाजगी गुंतवणुकीतही वाढ होत आहे, परंतु तेलाच्या वाढत्या किंमती चिंता वाढवू शकतात.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आर्थिक परिक्षण अहवालानुसार देशाचा जीडीपी या वर्षी 6.5 % दराने वाढेल. मान्सूनमुळे जीडीपीलाही आधार मिळेल. मात्र, यासोबतच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींबाबतही आर्थिक आढावा अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

खाजगी गुंतवणुकीत वाढ

बँकिंग क्षेत्राबाबत अहवालात म्हटले आहे की, बँकिंग क्षेत्रातील ग्रॉस एनपीए 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे. यासोबतच मान्सूनचा वेग वाढल्यानेही चांगली चिन्हे दिसू लागली आहेत. महागाईबद्दल बोलायचे झाले तर खाद्यपदार्थांच्या किंमती कमी होत आहेत.

अहवालात चिंतेची बाब कोणती?

आर्थिक अहवालानुसार, तेलाच्या किंमतींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तेलाच्या किंमती वाढल्याने चिंता वाढली असली तरी सध्या कोणताही धोका नाही. याशिवाय शेअर बाजारातही घसरणीच्या धोक्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.. यासोबतच जगातील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणुकीत घट होण्याचीही शक्यता आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अजूनही चिंतेचा विषय आहे.

अर्थ मंत्रालयाने अहवालात म्हटले आहे की चांगली देशांतर्गत मागणी आणि गुंतवणुकीमुळे आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत GDP 7.8 टक्के राहिला आहे. मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शहरी भागातील बेरोजगारी कमी झाल्याने वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT