Financial Freedom
Financial Freedom sakal
Personal Finance

Financial Freedom : आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल ...

डॉ. वीरेंद्र ताटके

गेल्या आठवड्यात आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध आघाड्यांवर सुरू असलेली आपल्या देशाची प्रगती ही देशातील नागरिकांसाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. याशिवाय जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या आठवड्यात १४ ऑगस्ट हा आर्थिक जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात आला.

सर्वसामान्य लोकांमध्ये आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण करून वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणे, हा यामागचा उद्देश आहे. वाढती महागाई, नोकरी-व्यवसायातील अस्थिरता,

वाढते आयुर्मान, विभक्त कुटुंुब पद्धतीचा प्रसार, आरोग्य सुविधांचा वाढता खर्च या कारणांमुळे तरुण वयातच आर्थिक नियोजनाची माहिती करून घेणे प्रत्येकाला आवश्यक झाले आहे. जेणेकरून आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने लवकरात लवकर वाटचाल सुरू करता येईल.

वैयक्तिक आर्थिक नियोजन

वैयक्तिक आर्थिक नियोजनाविषयी आपल्या देशातील नागरिकांमधील वाढत्या जागरूकतेचे प्रतिबिंब वेगवेळ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. बचत खात्यांमधील वाढ, ऑनलाइन व्यवहारांमध्ये झालेली वाढ,

शेअर बाजारातील व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या डी-मॅट खात्यांची विक्रमी संख्या, आयुर्विमा आणि आरोग्य विम्याचा प्रसार, म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, प्राप्तिकर विवरणपत्राविषयी जागरूकता या बाबींमधून सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढत असेलली आर्थिक जागरूकता लक्षात येते.

अंमलबजावणीत त्रुटी

  • रिझर्व्ह बँकेने अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की भारतीय नागरिकांना आर्थिक नियोजनाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, त्या ज्ञानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात ते कमी पडतात. आपण आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत का? हे तपासून पाहण्यासाठी पुढील पाच प्रश्न स्वतःला विचारून पाहावेत.

  • आपल्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा आपण बारकाईने आढावा घेऊन आपले उत्पन्न हे खर्चांपेक्षा अधिक आहे, याची खातरजमा केली आहे का?

  • घर, गाडी खरेदी, मुलांचे शिक्षण, घरातील शुभकार्ये, परदेशातील कौटुंबिक सहल यावर भविष्यात खर्च करायचा असेल, तर त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे का?

  • दुर्दैवी घटना, अचानक उदभवू शकणारे आजार, औषधोपचार यासाठी आपण विमा आणि आरोग्य विमा यांची तरतूद केली आहे का?

  • महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा देऊ शकणाऱ्या गुंतवणूक पर्यायांत आपण नियमित गुंतवणूक करतो का?

  • काही कारणांमुळे नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे थांबले, तरी आपल्या गुंतवणुकीवरील मिळणारा परतावा हा आपल्या खर्चापेक्षा अधिक आहे का?

  • वरील पाचही प्रश्नांची उत्तरे ‘होय’ आली, तर आपण आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहोत, असे समजावे. मात्र, यापैकी काही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ असे असेल, तर त्याबाबतीत आपल्याला त्यावर अजूनही काम करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यावे.

(लेखक इंदिरा ग्लोबल स्कूल ऑफ बिझनेस, पुणे येथे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT