Income Tax Sakal
Personal Finance

Income Tax: परदेशी फिरायला गेले अन् सोशल मीडियावर फोटो टाकून फसले, आली आयकर विभागाची नोटीस

अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर परदेशात प्रवास करतानाचे फोटो पोस्ट केल्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जात आहेत.

राहुल शेळके

Income Tax: कल्पना करा की तुम्ही परदेशात सहलीला गेला आहात आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर तुमच्या ट्विटर, फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर झाला.

पण जर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस आली, तर तुम्ही थोडा वेळ घाबरून जाल आणि विचार कराल की आयकर विभागाने नोटीस का पाठवली आहे. कारण अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर परदेशात प्रवास करतानाचे फोटो पोस्ट केल्यानंतर आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जात आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा आणि छाप्यांमुळे सगळेच घाबरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 15 आर्थिक प्रभावशाली व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

ज्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती देण्यासाठी परदेशी सहलींचे फोटो पोस्ट केले आहेत. ही नोटीस अशा लोकांना पाठवण्यात आली आहे जे परदेशी सुट्टीत महागडी शॉपिंग करताना दिसले होते.

करचोरी पकडली!

CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, 15 फाइनेंशियल इन्फ्लुएन्सरवर यांनी ज्या कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात केली त्यांच्याकडून भरघोस शुल्क वसूल करूनही शून्य किंवा खूपच कमी कर भरला. एकूणच उत्पन्न जास्त असून त्या प्रमाणात कर भरला नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.

फाइनेंशियल इन्फ्लुएन्सरच्या उत्पन्नाचा स्रोत

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स लाखो आणि कोटींच्या संख्येत आहेत. ते व्हिडिओ बनवून कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करतात, त्या बदल्यात त्यांना कंपन्यांकडून पैसे मिळतात.

इन्फ्लुएन्सर या जाहिराती आणि उत्पादनांच्या लिंक्स त्यांच्या सदस्यांना शेअर करतात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचे लाखो फॉलोअर्स असल्याने आणि यामुळे कंपन्यांना त्यांच्या विक्रीत मोठा फायदा होतो.

बरेच लोक गुंतवणूक करतात किंवा खरेदी करतात हे लक्षात घेऊन हे इन्फ्लुएन्सर सल्ला देतात. सध्या, इंस्टाग्रामवर अनेक इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाख किंवा कोटींमध्ये आहे.

शेअर बाजार नियामक सेबीने काही मोठ्या फाइनेंशियल इन्फ्लुएन्सरवर कारवाई केली आहे, तसेच या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी 2 महिन्यांत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहेत.

तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालय आरोग्य आणि फाइनेंशियल इन्फ्लुएन्सरसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी करेल. यानंतर, जेव्हा लोकांना कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यास सांगितले जाते तेव्हा फाइनेंशियल इन्फ्लुएन्सर व्यक्तीला संपूर्ण खुलासा करणे बंधनकारक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Recruitment: बीडमध्ये ७८१ पदांसाठी भरती! कोणती पदं भरली जाणार? शैक्षणिक पात्रता काय? वाचा सविस्तर...

Rohit Pawar : "भाजप निवडणूक हरेल म्हणून मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत" - रोहित पवार

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT