gita gopinath
gita gopinath sakal
Personal Finance

अर्थ क्षेत्रातील ‘नारीशक्ती’

सकाळ वृत्तसेवा

- अ‍ॅड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ कर सल्लागार

नवरा जेवढे पैसे देईल, त्यात काटकसरीने संसार करून बचत करणाऱ्या आणि कठीण परिस्थितीत त्या बचतीवर अडचण दूर करणाऱ्या अनेक महिलांच्या कथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. कुटुंबाचे हित हा एकच निकष असल्याने अर्थशास्त्र समजत नसले, तरी महिला निगुतीने कुटुंबाचे आर्थिक व्यवहार सांभाळत असतात. मात्र, आर्थिक निर्णय त्या घेत नाहीत.

गेल्या दोन दशकांत हे चित्र काहीसे बदलू लागले आहे. सैन्यदल, अंतराळ संशोधन, मर्चंट नेव्ही, पोलिस अशा पुरुषप्रधान क्षेत्राप्रमाणेच सनदी लेखापाल, आर्थिक गुंतवणूक सल्लागार, शेअर ब्रोकर या क्षेत्रात महिला दिसत आहेत. आपल्याकडे निर्मला सीतारामन या गेली पाच वर्षे देशाचे अर्थमंत्रिपद सांभाळत आहेत. या क्षेत्रातील नारीशक्ती आता दिसू लागली आहे.

अभिमानास्पद गीता गोपीनाथ

आतापर्यंत केवळ तीन महिला अर्थतज्ज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. एलिनोर ओस्ट्रोम यांना ‘पॉलिटिकल इकॉनॉमिक्स’साठी २००९ मध्ये, तर एस्थर डुफ्लो बॅनर्जी यांना २०१९ मध्ये त्यांचे पती अभिजित बॅनर्जी यांच्याबरोबर जागतिक गरीबी निर्मूलन प्रयोगासाठी आणि क्लाउडिया गोल्डिन यांना ‘महिलांचे अर्थव्यवस्थेतील योगदान व लैंगिक भेदभाव’ या विषयासाठी २०२३ चे पारितोषिक देण्यात आले.

आर्थिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करून भारताचे नाव जगाच्या नकाशावर ठळक करणाऱ्या गीता गोपीनाथ यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गीता यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले, तर उच्चशिक्षण श्रीराम कॉलेज, दिल्ली येथे झाले. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदव्यूत्तर पदवी संपादन केल्यावर वॅाशिंग्टन विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात मास्टर्स केले.

प्रिस्टन विश्वविद्यालयातून २००१ मध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यावर त्या शिकागो विश्वविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाल्या. हॉवर्ड विश्वविद्यालयात २००५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक अभ्यास’ या विषयाच्या प्रोफेसर म्हणून काम बघितले. परकी चलन, विनिमय दरप्रणाली, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, समस्या व संकटे, मुद्रा नीती अशा अनेक विषयांवरील त्यांचे ४० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

काही वर्षे त्या ‘अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यू’ या मासिकाच्या संपादक होत्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. सध्या त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. असा सन्मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

जागतिक अर्थ परिषदेने २०११ मध्ये त्यांचा ‘यंग ग्लोबल लीडर’ असा उल्लेख केला, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०१४ मध्ये सर्वांत तरुण प्रभावी अर्थतज्ज्ञ म्हणून गौरव केला. भारत सरकारने ‘प्रवासी भारतीय सन्मान’ देऊन गौरविले असून, त्या आता अमेरिकी नागरिक आहेत.

काही वर्षांत भारतीय बँकिंग क्षेत्रात महिलांनी सीईओपदापर्यंत मजल मारून लक्षणीय झेप घेतली आहे. अरुंधती भट्टाचार्य (स्टेट बँक), शिखा शर्मा (अॅक्सिस बँक), शामला गोपीनाथ (एचडीएफसी बँक), विभा पडळकर (एचडीएफसी लाईफ), उषा थोरात (रिझर्व्ह बँक) आदींचे योगदान मोठे आहे. यापुढे नव्या पिढीतील तरुणींना अर्थशास्त्र व आर्थिक व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यास या सर्व कर्तृत्ववान महिला प्रेरणादायी ठरतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT