Viral Acharya_RBI DyGoverner 
Personal Finance

Viral Acharya: "भारतातील 'पाच' घराण्यांमुळं वाढलीए महागाई"; RBIच्या माजी गव्हर्नरचा दावा

महागाई कमी करण्यासाठी त्यांनी उपाय देखील सुचवला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशातील पाच बड्या घराण्यांमुळं जनतेला महागाईचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी केला आहे. यासाठी त्यांनी उपायही सुचवला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे. (Five Families Driven Inflation in India Claimed by former RBI DyGovernor Viral Acharya)

आचार्य यांनी म्हटलं की, रिलायन्स ग्रुप, टाटा ग्रुप, आदित्य बिर्ला ग्रुप, अदाणी ग्रुप तसेच भारती टेलिकॉम या पाच बड्या घराण्यांच्या कंपन्यांमुळं छोट्या कंपन्यांचा नुकसान होत आहे. रिटेल रिसोर्सेस आणि टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये या कंपन्यांना किंमती ठरवण्याची ताकद आहे. महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा देखील हात आहे. यासाठी या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सन २०१७ पासून २०१९ या कालावधीत रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर असलेले विरल आचार्य यांनी म्हटलं की, सरकारच्या मोठ्या टेरिफनुसार देशातील बड्या कंपन्यांना संरक्षण मिळतं. तसेच विदेशी कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करु शकत नाहीत. देशातील महागाई वाढवण्यात या कंपन्यांचा मोठा हात आहे. स्पर्धा वाढवण्यासाठी आणि प्राईसिंग पावर कमी करण्यासाठी या पाच बड्या कंपन्यांचं विभाजन केलं पाहिजे. आचार्य हे न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्टर्न स्कूलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर राहिले आहेत.

आचार्य यांनी एका पेपरमध्ये म्हटलं की, कच्च्या मालाच्या किंमतीत घट झाल्याचा पूर्ण फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार नाही, कारण पाच बड्या कंपन्या मेटल, कोक, रिफाइंड पेट्रोलिअम प्रॉडक्स्ट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसह रिटेल ट्रेड आणि टेलिकम्युनिकेशन्सला नियंत्रित करते. सप्लाय चेनमधील अडचणी दूर झाल्यानं जगभरातील महागाई कमी झालेली असतानाही भारतात अद्यापही महागाई कायम आहे.

शक्तीकांत दास यांना केला होता विरोध

आचार्य यांनी जून २०१९ मध्ये कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी सहा महिने आधी आरबीआयमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पॉलिसी रेटच्या अनेक निर्णयांमध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याविरोधात मत दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT