FM Nirmala Sitharaman advice to job seekers amid impact of ai and global slowdown  Sakal
Personal Finance

AI Jobs: AIच्या जगात नोकरी शोधताय? चक्क देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला; म्हणाल्या...

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल.

राहुल शेळके

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. लोकसभा निवडणुकीनंतर स्थापन होणारे नवीन सरकार देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे.

अंतरिम अर्थसंकल्पानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. यादरम्यान, सीतारामन यांच्याशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बाबतही चर्चा झाली. सीतारामन म्हणाल्या की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आर्थिक विकासातील आव्हाने लक्षात घेऊन व्याजदरांबाबत निर्णय घेईल.

मुलाखतीत त्यांनी सांगितले की जगभरात चालू असलेली आर्थिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे नोकरीच्या बाजारपेठेवर परिणाम होत आहे. त्यामुळे आधीच नोकरी करणारे आणि सध्या नोकरीच्या शोधात असलेले लोक या दोघांवरही परिणाम होत आहे.

त्या म्हणाल्या की, झपाट्याने बदलणारी परिस्थिती पाहता आता नवीन कौशल्याची गरज आहे, कारण अशा परिस्थिती नवीन गरजा निर्माण होत आहेत ज्या आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या. त्याचप्रमाणे नवीन नोकरीच्या गरजा देखील बदलत आहेत.

या बदलांमध्ये सरकार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार सतत नवीन मोहिमा सुरू करत आहे आणि नवीन कार्यक्रम आणत आहे, जेणेकरून लोकांना त्यांची कौशल्ये सुधारण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यास मदत करता येईल.

नवीन गोष्टी शिकून, लोक बदलत्या परिस्थितीत नोकरी मिळविण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक तयार होतील आणि नवीन नोकरीच्या संधींचा लाभ घेण्यास सक्षम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT