Foreign direct investment into China slumps to worst in 30 years Sakal
Personal Finance

China Recession: जपान ब्रिटननंतर चीनवरही मंदीचे ढग? जागतिक आर्थिक मंदीचा भारतावर परिणाम होणार का?

China Recession: जगात आर्थिक मंदी येणार आहे का? जगातील देशांची स्थिती आणि आकडेवारी पाहिल्यास तुम्हालाही हाच प्रश्न पडेल. ब्रिटनपासून जपानपर्यंत अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. ऑस्ट्रेलियात बेरोजगारी शिखरावर आहे.

राहुल शेळके

China Recession: जगात आर्थिक मंदी येणार आहे का? जगातील देशांची स्थिती आणि आकडेवारी पाहिल्यास तुम्हालाही हाच प्रश्न पडेल. ब्रिटनपासून जपानपर्यंत अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत. ऑस्ट्रेलियात बेरोजगारी शिखरावर आहे. अशा स्थितीत त्याचा परिणाम येत्या काळात भारतावरही दिसून येईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यासोबतच जर्मनी, ब्रिटन आणि जपाननंतरची जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला मंदीचा फटका बसू शकतो की नाही हा मुद्दा विशेषतः अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांना सतावत आहे. (Foreign direct investment into China slumps to worst in 30 years)

चीनची अर्थव्यवस्था सतत मंदावत आहे. आकडे दडपूनही अर्थव्यवस्थेची वाईट स्थिती लपून राहिलेली नाही. चीनचे शेअर बाजार घसरत आहेत. आता आणखी एका आर्थिक आकडेवारीने मंदीची भीती वाढवली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात असे दिसून आले आहे की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला थेट विदेशी गुंतवणुकीच्या आघाडीवर मोठा धक्का बसला आहे. त्याचे आकडे 3 दशकांहून अधिक सर्वात वाईट स्थितीत आहेत.

जर एखाद्या अर्थव्यवस्थेने सलग दोन तिमाहीत नकारात्मक वाढ नोंदवली, तर ती तांत्रिकदृष्ट्या मंदीमध्ये असल्याचे मानले जाते. या मानकानुसार, सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचा थेट धोका नाही, परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेची मंदावलेल्या गतीमुळे इतर देश चिंतेत आहेत.

या जागतिक आर्थिक मंदीचा भारतावर परिणाम होणार का? हे जाणून घेण्यासाठी आरबीआयचे अलीकडील आर्थिक धोरण पाहिले पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांनंतरही महागाई कमी झालेली नाही.

यामुळेच RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात बदल केला नाही आणि तो अजूनही 6.5 टक्क्यांच्या पातळीवर आहे. RBI ने 2024-25 मध्ये देशाचा GDP वाढीचा दर 7 टक्के राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. यावरुन सध्या तरी भारतावर जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम होणार नाही असे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT