Gautam Adani Mukesh Ambani Sakali
Personal Finance

Fortune 500 List: मुकेश अंबानींच्या संपत्तीत मोठी वाढ, तर गौतम अदानी यांच्या संपत्तीत 49 टक्क्यांनी घसरण

Fortune 500 List: फॉर्च्युन 500 च्या अहवालात देशातील 157 सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीत 133 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Fortune 500 List: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानी समूहाचे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

फॉर्च्युन 500 च्या अहवालानुसार, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती यांच्या निव्वळ संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण 65,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 8.19 लाख कोटी रुपये आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक आहे.

गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 7.54 लाख कोटी रुपये होती. या वर्षी त्यांच्या संपत्तीत वाढ झाली असून जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत ते अव्वल स्थानावर आहेत.

फॉर्च्युन 500 च्या अहवालानुसार, भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदानी यांची घसरण झाली आहे.

ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीतही गौतम अदानी यांची घसरण झाली आहे. फॉर्च्युन 500 च्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 49 टक्क्यांनी घसरण झाली आहे आणि ती 5.24 लाख कोटी रुपयांवर आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला भारतातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी पहिल्या क्रमांकावर होते. मात्र 24 जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत आणि एकूण संपत्तीत मोठी घट झाली आहे.

फॉर्च्यून 500 च्या अहवालात देशातील 157 सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या संपत्तीत 133 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 69.30 लाख कोटी रुपये आहे. देशातील 10 श्रीमंतांकडे एकूण संपत्तीच्या 41.65 टक्के संपत्ती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT